100 दिवसांत एकही कोरोना रुग्ण न सापडलेल्या न्यूझीलंडमधून आली धक्कादायक बातमी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 11 August 2020

तब्बल 100 दिवस न्यूझीलंडमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे जगभरातून या देशाचं कौतुक होत होतं.

वेलिंग्टन- तब्बल 100 दिवस न्यूझीलंडमध्ये (New Zealand) एकही कोरोनाचा (Coronavirus) रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे जगभरातून या देशाचं कौतुक होत होतं. असे असतानाच न्यूझीलंडमध्ये 102 दिवसानंतर कोरोना रुग्ण आढळल्याची बातमी आली आहे. एका परिवारातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना वेगवेगळे करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे.

पहिली लस रशियाचीच; पुतीन यांची घोषणा, मुलीलाही दिली लस

सर्व जग कोरोना महामारी पुढे हतबल होत असताना न्यूझीलंडने सर्व देशांसमोर आदर्श ठेवला आहे. न्यूझीलंडने मार्चच्या शेवटपर्यंत कडकडीत टाळेबंदी लागू केली होती. तसेच देशाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलंडला कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळालं होतं. 100 दिवसांपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण देशात सापडला नव्हता. मात्र, आता देशात चार रुग्ण सापडले आहेत. 

न्यूझीलंडमध्ये गेल्या तीन महिन्यांत 1,200 कोरोना रुग्ण सापडले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण बाहेर देशातून आलेले आहेत. परदेशातून आलेल्या लोकांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यांना 14 दिवस सक्तीच्या विलगीकरणात ठेवलं जात आहे. सध्या परदेशातून आलेले 24 जण विलगीकरणात आहेत.  न्यूझीलंडच्या प्रधानमंत्री जॅसिंडा अॅडर्न (Prime Minister Jacinda Ardern) यांनी देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी वेळीच उपाय केले होते. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचे जगभर कौतुक होत आहे. 

अरे देवा! वडीलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेला अन् डॉक्टरांनी दिले डेथ सर्टीफिकेट

जॅसिंडा अॅडर्न यांनी ऑकलँड येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्याची माहिती दिली आहे. ऑकलँडला आता लेवल-3 ची टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना घरीच राहण्याचे आव्हान जॅसिंडा यांनी केलं आहे. आपण कोरोना प्रादुर्भावावर लवकरच नियंत्रण मिळवू, असंही त्या म्हणाल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 1200 च्या पुढे कोरोना रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत 22 जणांचा कोरोना विषाणूने प्राण घेतला आहे. कोरोना नियंत्रणात आला असल्याने देशातील जनजीवन सर्वसामान्य झाले आहे. तसेच देशात सर्व उद्योगधंदे, उद्याने आणि चित्रपटगृहे सुरु करण्यात आले आहेत. न्यूझीलंडची लोकसंख्या 50 लाख आहे. 

(edited by-kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus breaks out again in New Zealand after 102 days