अनेक देशांची चुकीच्या मार्गाने वाटचाल; जागतिक आरोग्य संघटना

वृत्तसंस्था
Tuesday, 14 July 2020

कोरोनामुळे जगभरात निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी परिस्थिती अजून गंभीर होईल असा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक देश चुकीच्या मार्गाने वाटचाल करत आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. कोरोनामुळे जगभरात निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी परिस्थिती अजून गंभीर होईल असा इशारा दिला आहे. त्यातच युरोप आणि आशियामध्ये तर परिस्थिती हाताबाहेर जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोना संसर्ग अद्यापही लोकांचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असून जिनिवा येथे करोनासंबंधी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. जर मुलभूत नियमांचं पालन केलं नाही तर महामारी गंभीर, आणि अतीगंभीर रुप धारण करेल, असं टेड्रोस यांनी म्हटले आहे. सध्या जगभरात १ कोटी ३२ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर मृतांची संख्या साडे पाच लाखांच्या पुढे गेली आहे. टेड्रोस यांनी यावेळी रविवारी २ लाख ३० हजार नवे रुग्ण मिळाले असून यामधील ८० टक्के रुग्ण १० देशांमधील असून फक्त दोन देशांमध्ये ५० टक्के रुग्ण मिळाले असल्याचं सांगितले आहे. अमेरिका आणि ब्राझिलला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे.
--------------
सचिन पायलट यांच्यासोबत किती आमदार? थेट व्हिडिओ प्रसिद्ध करत दिले उत्तर
--------------
कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालये बंद असताना अनेक देशांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा शाळा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची परिस्थिती अजून गंभीर होईल अशी भीतीही जागतिक आरोग्य संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी शाळा सुरु करण्यासाठी घाई केली जाऊ नये असं म्हटलं आहे. तसेच शाळांना राजकारणात आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. एकदा कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाला की सुरक्षितपणे शाळा सुरु केल्या जाव्यात असं त्यांनी सांगितलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus crisis may get worse and worse and worse warns WHO