कोरोनामुळे दोन हजार ४४२ जणांचा मृत्यू 

पीटीआय
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत दगावणाऱ्यांची संख्या दोन हजार ४४२ इतकी झाली आहे.

बीजिंग - चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत दगावणाऱ्यांची संख्या दोन हजार ४४२ इतकी झाली आहे. तर कोरोना विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७८ हजार इतकी झाली असल्याची माहिती चीनच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

दरम्यान शनिवारी कोरोना विषाणूचे मुख्य केंद्र असलेल्या चीनमधील वुहान शहराचा जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तज्ज्ञांनी दौरा केला. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांनी आपल्या चिनी समीक्षांबरोबर एक संयुक्त तपास पथक बनवले आहे. या पथकाने आरोग्य संस्थांचा दौरा केला आहे. हाँगकाँग येथील साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने म्हटले की, या पथकात अमेरिका, जर्मनी, जपान, नायजेरिया, रशिया, सिंगापूर आणि दक्षिण कोरियातील तज्ज्ञांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus death toll in China s to 2442