Coronavirus : कोरोना संसर्गाचे एक वर्ष

वृत्तसंस्था
Thursday, 19 November 2020

जगभरात वेगाने पसरलेल्या कोरोना संसर्गाने जगभरातले व्यवहार ठप्प पाडले, अर्थव्यवस्था डबघाईला आणली. या विषाणूच्या प्रसाराचा आणि परिणामांचा घटनाक्रम - 

जगभरात वेगाने पसरलेल्या कोरोना (corona) संसर्गाने जगभरातले व्यवहार ठप्प पाडले, अर्थव्यवस्था डबघाईला आणली. या विषाणूच्या प्रसाराचा आणि परिणामांचा घटनाक्रम - 

२०१९
१७ नोव्हेंबर : चीनमध्ये पहिला रुग्ण आढळल्याची अनधिकृत नोंद 
८ डिसेंबर : चीनने पहिला रुग्ण आढळल्याचे आरोग्य संघटनेला कळविले, संसर्गजन्य नसल्याचा दावा
३१ डिसेंबर :  वुहानमध्ये ‘संसर्गजन्य हिवतापा’ची २७ प्रकरणे आढळल्याचे चीनने जागतिक आरोग्य संघटनेला सांगितले. वुहानमधील मांस बाजार बंद. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जानेवारी २०२०
११ : चीनमध्ये ६१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. नव्या विषाणूमुळे मृत्यू झाल्याची नोंद
१३ : थायलंडमध्ये चिनी महिला विलगीकरणात. चीनबाहेरील पहिले विलगीकरण
१५ : जपानमध्ये पहिला रुग्ण
२२ : ‘डब्लूएचओ’ची पहिली बैठक. नव्या विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर धोका नसल्याचा दावा. 
२३ : चीनमधील मृत्यूसंख्या १८. हुबेई प्रांतात लॉकडाउन
२४ : युरोपातील पहिला रुग्ण फ्रान्समध्ये
३० : भारतात केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण. जागतिक पातळीवर संसर्ग झाल्याचे डब्लूएचओकडून जाहीर

फेब्रुवारी
१ : चीनमध्ये प्रवास केलेल्यांना अनेक देशांत बंदी
२ : फिलीपीन्समध्ये एका व्यक्तीचा मृत्यू. चीनबाहेरील पहिला मृत्यू. 
५ : जपानच्या किनाऱ्यावरील डायमंड प्रिन्सेस जहाजावरील ३७०० जण विलगीकरणात
७ : विषाणूबाबत पूर्वसूचना देणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू
२२ : इटलीत लॉकडाउन सुरू

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मार्च
३ : अमेरिकेत व्याजदरात घट; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरण
९ : कच्च्या तेलाची किमतीत २५ टक्क्यांनी घट
१० : इटली, इराण कोरोना संसर्गाची केंद्रे; इटलीत पूर्णपणे लॉकडाउन
१३ : अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर
१४ : फ्रान्स आणि स्पेनमध्ये लॉकडाउन
१९ : इटलीतील मृतांची संख्या चीनच्या पुढे; विषाणू १७० देशांमध्ये
२३ : भारतात लॉकडाउन
२४ : जपानमधील ऑलिम्पिक लांबणीवर
२५ : अमेरिकेचे दोन हजार अब्ज डॉलरचे आर्थिक पॅकेज

एप्रिल  
८ : वुहानमधील लॉकडाउन उठविले

मे 
८ : अमेरिकेत दोन कोटी जणांनी रोजगार गमावले
२९ : ट्रम्प यांनी डब्लूएचओ बरोबरील संबंध तोडून टाकले

जून
८ : न्यूझीलंड कोरोनामुक्त
१५ : ब्रिटनमधील दुकाने खुली
२८ : जगातील मृतांची संख्या ५ लाखांवर

जुलै
६ : बाधितांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर

ऑगस्ट
६ : ३ नोव्हेंबरपूर्वी लस येणार असा ट्रम्प यांचा दावा 
११ : रशियाकडून लस जाहीर 

सप्टेंबर
७ : ब्राझीलला मागे टाकून बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर
१८ : युरोपात पुन्हा निर्बंध घालण्यास सुरुवात

ऑक्टोबर
युरोपसह जगभरात कोरोनानियमांसह व्यवहार

नोव्हेंबर
अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी/तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus One Year Completed

Tags
टॉपिकस
Topic Tags: