Coronavirus: ही व्यक्ती करणार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची मदत

वृत्तसंस्था
Wednesday, 8 April 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असाताना संपूर्ण जगच एकप्रकारे लॉकडाऊन असल्याने सर्वचजण अडचणीत सापडले आहेत. अशात ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष (सीईओ) जॅक डॉर्सी यांनी करोनाविरुद्धच्या लढाईसाठी एक बिलीयन डॉलर म्हणजेच अंदाजे ७ हजार ६२० कोटी मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. डॉर्सी यांनी यासाठी स्क्वेअर इन, या कंपनीमधील त्यांची मालकी हक्क विकून पैसे उभे करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

न्यूयॉर्क : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असाताना संपूर्ण जगच एकप्रकारे लॉकडाऊन असल्याने सर्वचजण अडचणीत सापडले आहेत. अशात ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष (सीईओ) जॅक डॉर्सी यांनी करोनाविरुद्धच्या लढाईसाठी एक बिलीयन डॉलर म्हणजेच अंदाजे ७ हजार ६२० कोटी मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. डॉर्सी यांनी यासाठी स्क्वेअर इन, या कंपनीमधील त्यांची मालकी हक्क विकून पैसे उभे करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉर्सी यांनी ट्विटरच्या माध्यमातूनच ही माहिती दिली आहे. आपल्या एकूण संपत्तीपैकी २८ टक्के वाटा हा कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी दान करणार असल्याचे यामध्ये सांगितले आहे. ही मदत ते अशा संस्थांना देण्यात येणार आहेत ज्या जगभरामध्ये हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन कमाईसंदर्भात काम करणार आहेत. त्याचप्रमाणे मुलींचे आरोग्य आणि शिक्षणसाठी काम करणाऱ्या संस्थांनाही या निधीमधून मदत केली जाणार असल्याचे डॉर्सी यांनी स्पष्ट केलं आहे.

Coronavirus : कोरोनाची सुरुवात झाली त्या चीनची सध्या काय आहे परिस्थिती?

डॉर्सी यांनी आतापर्यंत कधीच ते करत असलेल्या समाजकार्याबद्दलची माहिती उघड केली नव्हती. मात्र त्यांनी आता ही सर्व माहिती जनतेसाठी खुली केली आहे. एका पब्लिक डॉक्युमेंटची लिंक त्यांनी शेअर केली असून त्यावर डॉर्सी यांच्यामार्फत करण्यात येणाऱ्या समाजकार्यासंदर्भातील निधीची माहिती पाहता येणार आहे. ट्विटरच्या माध्यमातून मदत करण्याऐवजी डॉर्सी यांनी स्क्वेअर इनच्या माध्यमातून निधी देण्याचा निर्णय घेण्यामागे एक खास कारण असल्याचे सांगितलं जात आहे. स्क्वेअर इनच्या मालकीमध्ये डॉर्सी यांचा वाटा हा ट्विटरमधील वाट्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळेच त्यांनी स्क्वेअर इनमधील हिस्सेदारी विकून त्या माध्यमातून टप्प्या टप्प्यामध्ये हा निधी दिला जाणार आहे.

कोण आहेत जॅक डॉर्सी?
जॅक डॉर्सी ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष (सीईओ) असून डॉर्सी हे स्क्वेअरचे सहसंस्थापक असून सध्या तेच कंपनीचे नेतृत्व करत आहेत. ही कंपनी डिजीटल पेमेंट क्षेत्राशी संबंधित काम करते. फोर्ब्सच्या माहितीनुसार डॉर्सी यांची एकूण संपत्ती ३.३ बिलियन डॉलर इतकी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus: Twitter boss pledges $1bn for relief effort