Coronavirus News: चीनला जाताय? मग, परदेशी प्रवाशांबाबत जिनपिंग सरकारनं घेतलाय मोठा निर्णय; जाणून घ्या कोणता?

चीनमध्ये कोरोना संसर्गाची लाखो प्रकरणं समोर येत आहेत.
Coronavirus in China, Coronavirus News
Coronavirus in China, Coronavirus Newsesakal
Summary

चीनमध्ये कोरोना संसर्गाची लाखो प्रकरणं समोर येत आहेत.

बीजिंग : चीनमध्ये कोरोना संसर्गाची (Coronavirus in China) लाखो प्रकरणं समोर येत आहेत. दरम्यान, जिनपिंग सरकारनं झिरो कोविड धोरण (Zero Covid Policy) आणखी शिथिल केलंय. चीन सरकारनं परदेशी प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.(Coronavirus News)

8 जानेवारीपासून परदेशी प्रवाशांना क्वारंटाईनमध्ये (Quarantine) राहावं लागणार नाही, असं चीननं (Chinese Government) म्हटलंय. दरम्यान, मार्च 2020 मध्ये परदेशी प्रवाशांना (Foreign Travelers) चीनमध्ये क्वारंटाईनमध्ये राहणं अनिवार्य करण्यात आलं होतं. यासोबतच चीननं सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिलीये. आता तीन वर्षांपूर्वीप्रमाणंच सर्व देशांतील प्रवासी चीनमध्ये येऊन तिथं फिरू शकतील. चीन सरकारच्या या निर्णयाचा फायदा सर्व भारतीय विद्यार्थ्यांनाही होण्याची शक्यता आहे.

Coronavirus in China, Coronavirus News
Indian Constitution : मोदी सरकारची विचारसरणी स्पष्ट आहे, देश संविधानानुसारच चालेल - किरेन रिजिजू

चीन सरकारनं कार्यालये, कारखाने आणि बाजारपेठाही उघडल्या आहेत. सोमवारी राजधानी बीजिंग आणि सर्वात मोठे शहर शांघायच्या मेट्रो ट्रेन खचाखच भरलेल्या दिसल्या. लोक मास्क घालून आणि सॅनिटायझर वापरून प्रवास करताना आणि व्यवसाय करताना दिसले.

Coronavirus in China, Coronavirus News
Rahul Gandhi : प्रभू रामाशी राहुल गांधींची थेट तुलना; खुर्शीद म्हणाले, रामाची भूमिका घेऊनच आम्ही..

चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढलीये. 7 डिसेंबरला राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी झिरो कोविड धोरणातील तरतुदी शिथिल करण्याची घोषणा केली. यानंतर चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या झपाट्यानं वाढू लागली. असा दावा केला जातोय की, 'चीनमध्ये सध्या करोडो कोरोना बाधित असून मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com