तरुणांनो, तुम्ही अजिंक्य नाही, तुम्हालाही होऊ शकतो... : डब्ल्यूएचओ 

वृत्तसंस्था
रविवार, 22 मार्च 2020

या साथीच्या रोगाने जगभरातील अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, अनेकांना त्यांचे व्यवसाय बंद करून घरी बसावे लागले आहे. त्यामुळे या रोगाचे गांभीर्य ओळखायला हवे.

रोम : इटलीमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला असून, देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये ताळेबंदी केली आहे. मात्र, या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी ताळेबंदी मोडत घराबाहेर फिरणाऱ्या तरुणांना जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) इशारा दिला असून 'तुम्ही अजिंक्य नाहीत', तुम्हालाही याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे म्हणत त्यांचे कान टोचले आहेत. CoronaVirus

या साथीच्या रोगाने जगभरातील अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, अनेकांना त्यांचे व्यवसाय बंद करून घरी बसावे लागले आहे. त्यामुळे या रोगाचे गांभीर्य ओळखायला हवे. जास्तीत जास्त लोकांनी आपापल्या घरातच राहायला हवे, असेही डब्ल्यूएचओने या वेळी सांगितले.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस अ‍ॅडॅनॉम घेबेरियस यांनी याचे गांभीर्य सांगताना तरुणांना आवाहन केले की आज तरुणांकरिता माझ्याकडे एक संदेश आहे. आपण अजिंक्य नाहीत. हा विषाणू आपल्याला रुग्णालयामध्ये पोचवू शकतो किंवा तुम्हाला ठार मारू शकतो, त्यामुळे याचे गांभीर्य ओळखा आणि घरातच राहा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Young people are not invincible WHO warns