चंद्रावरील कापसाचा कोंब नष्ट; तापमान घटल्याचा परिणाम

पीटीआय
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

बीजिंग (वृत्तसंस्था) : चीनने "चांग इ-4' या अवकाशयानातून कापसाचे बी पाठविले होते. ते पेरल्यानंतर त्याला कोंब फुटल्याचे मंगळवारी (ता. 15) जाहीर करण्यात आले होते. मात्र, याच्या दुसऱ्याच दिवशी हे कोंब मरून गेल्याचे वृत्त आले आहे. 

चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही, त्या भागात "चांग इ-4' हे अवकाशयान चीनने काही दिवसांपूर्वी उतरविले आहे. त्या यानातून नेलेले कापूस व बटाट्याचे बी पेरण्यात आले होते. त्यापैकी कापसाला कोंब फुटले होते. चंद्रावर रात्रीचे तापमान उणे 170 अंशांपर्यंत उतरल्याने कोंब कोमेजल्याचे सांगण्यात आले.

सूर्याच्या प्रकाशात कापसाची वाढ चांगली होत होती. मात्र रात्री तापमान घटल्यानंतर कोंब नष्ट झाले. चंद्रावर एक रात्र दोन आठवडे असते. या दरम्यान तेथील तापमानात मोठ्या प्रमाणात घसरते. चंद्रावर दिवसाचे तापमान 120 अंश सेल्सिअसवर पोचते. 

"चंद्रावरील वातावरणावर परिणाम नाही' 

चीनच्या या प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ शाय गेंगशिन म्हणाले, ""कापसाचा कोंब लवकरच मरेल, असा आमचा अंदाज होता. रात्रीच्या वेळी चंद्रावर कोणतेही रोप जिवंत राहणे शक्‍यच नाही.

"चांग इ-4' यान चंद्रावर रविवारी (ता. 12) उतरले, त्या वेळी चंद्रावर पहिली रात्र होती. त्याचदिवशी "चांग इ-4' रोव्हर "स्लिप मोड'वर गेले.'' चंद्रावरील कोंब व बियांचे हळूहळू विघटन होईल. यामुळे चंद्रावरील वातावरणावर काहीही परिणाम होणार नाही. चंद्रावर रोप उगवण्याचा प्रयोग आम्ही प्रथमच केला होता. चंद्रावर कशाप्रकारचे वातावरण असेल, याचा अनुभव आम्हाला नव्हता,' असेही ते म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton litter Destroyed due to temperature reduction on Moon