दहशतवादाला संरक्षण देणारे देश दोषी - तिरुमूर्ती

दहशतवादीविरोधी सप्ताहाच्या दुसऱ्या आठवड्यात ‘कोरोनानंतरच्या काळातील दहशतवाद्यांना आर्थिक मदत रोखणे’ या विषयावर उच्चस्तरिय कार्यक्रमाचे ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारी (ता.२५) झाला.
TS Tirumurti
TS TirumurtiSakal

न्यूयॉर्क - गेल्या अनेक दशकांपासून भारत (India) हा दहशतवादाचा (Terrorist) विशेषतः सीमेपलीकडील दहशतवाद बळी ठरत आहे. दहशतवादी कारवायांना मदत करणे, प्रोत्साहन देणारे व त्यांना संरक्षण देणारे काही देश खरे दोषी आहे, असे भारताने संयुक्त राष्ट्रात (यूएन) स्पष्टपणे सांगितले. यात अप्रत्यक्षपणे भारताचा इशारा पाकिस्तानकडे होता. (Countries that Protect Terrorism are to Blame TS Tirumurti)

दहशतवादीविरोधी सप्ताहाच्या दुसऱ्या आठवड्यात ‘कोरोनानंतरच्या काळातील दहशतवाद्यांना आर्थिक मदत रोखणे’ या विषयावर उच्चस्तरिय कार्यक्रमाचे ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारी (ता.२५) झाला. यात भाग घेतलेले ‘यूएन’मधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती म्‍हणाले की, दहशतवादाला यशस्वीपणे नामोहरम करण्यासाठी दहशतवाद्यांचे आर्थिक स्रोत बंद करणे आवश्‍यक आहे. ‘भारत गेल्या काही दशकांपासून दहशतवादाला बळी ठरत आहे. विशेष करून सीमेपलीकडील दहशतवादाचा धोका भारताला आहे.

TS Tirumurti
आशियात 20 हजार वर्षांपूर्वीच येऊन गेलाय कोरोना; DNA त मिळाले अवशेष

काही असे देश आहेत ज्यांच्याकडे दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडण्यासाठी आवश्‍यक क्षमता आणि कायदे व्यवस्थेचा अभाव आहे. त्याचवेळी काही देश दहशतवादाला मदत, पाठिंबा देतात व स्वतःहून आर्थिक साह्य करीत सुरक्षित आश्रय देतात, ते खरे दोषी आहेत,’ असे त्यांनी नमूद केले. कमकुवत देशांच्या क्षमता वाढविण्यास आपण मदत केली पाहिजे’, असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com