होय! एकेकाळी कोरोनासमोर हतबल झालेल्या या देशातील चित्रपटगृहे पुन्हा सुरु

कार्तिक पुजारी
Thursday, 23 July 2020

कोरोना महामारी जगभरात थैमान घालत असताना चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय धाडसाचा असेल. मात्र, चीनने आपली चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

बिजिंग- कोरोना महामारी जगभरात थैमान घालत असताना चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय धाडसाचा ठरेल. मात्र, चीनने आपली चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. यामुळेच सरकारने शुक्रवारपासून चित्रपटगृहांना परवानगी दिली आहे. मात्र, देशातील सरसकट चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आलेली नाही. कमी धोकादायक असणाऱ्या भागातील चित्रपटगृहे सुरु केली जाणार आहेत. शिवाय चित्रपटगृहे प्रशासनाला कठोर स्वच्छताविषयक नियम पाळावे लागणार आहेत.

भारतात कोरोनाचा उद्रेक वाढतोय; गेल्या 24 तासांत...
चित्रपटगृहे सुरु करतानाच काही अटी घालण्यात आल्या आहेत.  चित्रपटगृहांच्या एकूण क्षमतेच्या फक्त ३० टक्के लोकांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय प्रेक्षकांना एक सिट सोडून बसवण्यात येणार आहे. प्रक्षेकांना चित्रपटगृहात मास्क घालणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ आतमध्ये दिले जाणार नाहीत. शिवाय प्रेक्षकांना चित्रपटगृहात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना शारीरिक अंतराचे पालन करावे लागणार आहे.

चीनमध्ये जानेवारी महिन्यात चित्रपटगृहे बंदे करण्यात आली होती. या काळात चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. सहा महिन्याच्या कालावधीनंतर चीनने कोरोना विषाणूवर हळूहळू ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. त्यामुळे कम्युनिस्ट सरकारने चित्रपटगृहे पुन्हा उघडली केली आहेत. शिवाय राजधानी बिजिंगच्या चित्रपटगृहात डूलिटल आणि ब्लडशॉट हे हॉलिवूड चित्रपट दाखवले जाणार आहेत.

भूकंपाने हादरला चीन; तीव्रताही मोठी
बिजिंगमध्ये सध्या २६३ चित्रपटगृहे आहेत. पण जे चित्रपटगृहे अती धोकादायक क्षेत्रात येतात अशा भागातील चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आलेली नाही. ज्या मालकांना चित्रपटगृहे सुरु करायची आहेत, अशांना ते दाखवू इच्छिणाऱ्या चित्रपटांची यादी चित्रपट प्रशासनाकडे द्यावी लागणार आहे.

दरम्यान, चीनच्या वुहान प्रांतामधून कोरोना विषाणूचा प्रसार जगभर झाला होता. सद्यस्थितीत कोरोना जगभरात हाहाकार माजवत असून अनेक देश चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याचा विचारही करु शकत नाहीत. अशात चीनने चित्रपटगृहे सुरु करण्याचा घेतलेल्या  निर्णयाने अनेकांना आवाक केले. आपल्याही देशात कधी चित्रपटगृहे सुरु होतील असा विचार अनेकांच्या मनात आता डोकावू लागला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this country To Reopen Some Cinemas Friday