सेक्स करताना बाल्कनीतून पडून दोघांचा जागीच मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

क्यूटो (इक्वेडोर) : इमारतीच्या तिसऱया मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये सेक्स करत असताना खाली पडून दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

क्यूटो (इक्वेडोर) : इमारतीच्या तिसऱया मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये सेक्स करत असताना खाली पडून दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अठ्ठावीस वर्षीय महिलेने ग्रॅज्युएशनच्या पार्टीचे घरामध्ये आयोजन केले होते. पार्टीसाठी मित्र परिवार आले होते. मध्यरात्री पार्टी सुरू असताना 28 वर्षीय महिला व तिचा 35 वर्षीय प्रियकर सेक्स करण्यासाठी फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये गेले होते. सेक्स करत असताना ते तिसऱया मजल्यावरून खाली पडले. खाली पडल्यानंतर मोठा आवाज झाल्यामुळे नागरिक बाहेर आले. दोघांना नग्नावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.'

महिला 8 वर्षांच्या मुलीची आई होती तर तिचा प्रियकरही विवाहीत होता. दोघांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला, याबाबत तपास करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Couple Falls To Death From Third Floor Balcony While Having Sex