ब्रिटनमध्ये पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण

एका पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण

गेल्या दोन वर्षांपासून जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा संसर्ग अद्याप कमी झालेला नाही. नव्या व्हेरिअंटमुळे पुन्हा नवी लाट येण्याची भीती सतत व्यक्त केली जात आहे. त्यातच आता ब्रिटनमधून चिंता वाढवणारी अशी माहिती समोर आली आहे. एका पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये इतर प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन नोव्हेंबरला वेयब्रिदमध्ये पशु आणि पक्षी आरोग्य संस्थेच्या प्रयोगशाळेत चाचणीनंतर कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. सध्या त्याच्यावर घरीच उपचार केले जात असून प्रकृती सुधारत असल्याचं सांगण्यात येतंय.

हेही वाचा: मोठी उद्दीष्टे निश्‍चित करा; पर्यावरण परिषदेचा मसुदा तयार

कुत्र्याला कोरोना होण्याआधी त्याच्या मालकाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, कुत्र्याला त्याच्या मालकामुळे संसर्ग झाला की इतर कोणत्या प्राण्यापासून याचा खुलासा होऊ शकला नाही. वैद्यकीय अधिकारी क्रिस्टिन मिडिलमिस यांनी सांगितलं की, कुत्र्यांना कोरोनाची लागण होणं ही खूपच दुर्मीळ बाब आहे. सर्वसामान्यपणे फक्त हलकी लक्षणे दिसतात आणि काही दिवसांमध्ये ठिकही होतात. आता याचा कोणताही पुरावा नाही की पाळीव प्राण्यांमध्ये कोरोनाची लागण थेट माणसांकडून झाली. सध्या कुत्र्यावर देखरेखीखाली उपचार केले जात आहेत.

प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार समोर आल्यानंतर जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. कारण सध्या फक्त मानवासाठी कोरोना लस तयार करण्यात आली आहे. प्राण्यांसाठी तरी लस उपलब्ध नाही. त्यातच पाळीव कुत्र्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग हा धोकादायक ठरू शकतो.

loading image
go to top