Corona Update : फक्त चीनच नाही तर 'या' चार देशांमध्ये कोरोना वाढला; धक्कादायक आकडेवारी

Corona Update
Corona Updateesakal

नवी दिल्लीः नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोरोनाने जगाची झोप उडवली आहे. चीन सरकारकडून अधिकृतरित्या काहीही समोर येत नसलं तरी तिथून येणाऱ्या बातम्या धक्कादायक आहेत.

एका दिवसात एकट्या चीनमध्ये साडेतीन कोटी लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्याने हादरा बसला आहे. चीनमध्ये तर कोरोनाने हाहाःकार माजवला आहेच. पण आणखी चार देशांमध्ये कोरोना पसरतोय.

हेही वाचाः Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

चीनशिवाय अमेरिका, जपान, ब्रिटन आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोनाने वेग धरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-१९ रिस्पॉन्स टीमममधील महामारी विशेषज्ञ मारिया वान यांच्यानुसार जगभरात प्रत्येक आठवड्यामध्ये ८ ते १० हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होतो.

Corona Update
China Corona Video : प्रेतांचा खच, ऑक्सिजनही संपलं; चीनमधला झोप उडवणारा व्हीडिओ

जगभरातल्या कोरोना अपडेट्सनंतर भारत सरकार अलर्ट मोडवर आलेलं आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीनोम सीक्वेंसिंगवर भर देण्याचं राज्यांना सांगितलं आहे.

सरकारी आकडेवारीनुसार जपानमध्ये बुधवारी दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, २५ ऑगस्टनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने संक्रमण झालं.

दक्षिण कोरियामध्ये Yonhp च्या माहितीनुसार वाढत्या थंडीमुळे गुरुवारी ७५ हजारांपेक्षा जास्त नवीन बाधित आढळून आलेले आहे. मागच्या आठवड्यापेक्षा ही आकडेवारी ५ हजार ६००ने जास्त आहे.

अमेरिकेतली परिस्थिती पाहिल्यास मागच्या २८ दिवसांमध्ये १५ लाख ८९ हजार २८४ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. बिझनेस इनसाईडरने यासंदर्भातील माहिती दिली होती. आतापर्यंत अमेरिकेमध्ये कोरोनाचे १० कोटींपेक्षा जास्त समोर आलेल्या आहेत.

सध्या ब्रिटनमध्ये रुग्णालयात गर्दी दिसतेय. गुरुवारी ४६ हजार ४२ नवीन कोरोना रुग्ण आढळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com