कोविडग्रस्त महिलेला दिला व्हायग्राचा डोस; कोमातून आली बाहेर

कोरोना महामारीने अनेकांच्या जवळच्या व्यक्ती कायमच्या हिरावून नेल्या आहेत.
कोविडग्रस्त महिलेला दिला व्हायग्राचा डोस; कोमातून आली बाहेर

लंडन : कोरोना महामारीने (Covid Pandemic) अनेकांच्या जवळच्या व्यक्ती कायमच्या हिरावून नेल्या आहेत. यावर अद्याप ठोस उपचार अथवा औषध (Medicine On Covid ) सापडलेले नसून यापासून लसीकरण (Coron Vaccination) हाच एकमेव मार्ग असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कोरोनामुळे गेल्या 28 दिवसांपासून कोमामध्ये आणि व्हेंटिलेटरवर असलेली महिला केवळ व्हायग्रा औषधामुळे शुद्धीवर आल्याचा चमत्कार समोर आला आहे. ही घटना ब्रिटनमधील असून याबाबत द सनने वृत्त दिले आहे. (Covid Patient Come Out After Nurse Give Her Viagra Pill)

कोविडग्रस्त महिलेला दिला व्हायग्राचा डोस; कोमातून आली बाहेर
'त्या' क्रूझवर 66 पॉझिटीव्ह; एकट्यापायी 2 हजारांना थांबवण्याचा निर्णय ठरला योग्य

द सनच्या वृत्तानुसार, मोनिका या एनएचएस लिंकनशायरमध्ये कोविड (Covid Ward) विभागात काम करत होत्या. त्यावेळी त्यांना कोरोनाची (Corona Symptoms) लागण झाली. दरम्यान, ज्यावेळी मोनिका यांची प्रकृती अधिक बिघडल्याने आणि ऑक्सिजनची (Oxygen Level) पातळी कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्या 28 दिवसांपासून कोमात होत्या. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी मोनिका यांना उत्तेजन देणारे औषध व्हायग्राचा डोस दिला. त्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या कोमातून बाहेर आल्या तसेच त्यांचे व्हेंटिलेटरदेखील काढण्यात आले. (Covid Coma Patient)

कोविडग्रस्त महिलेला दिला व्हायग्राचा डोस; कोमातून आली बाहेर
वर्क फ्रॉम होमसाठी नवे नियम लागू होणार! सरकारने आखली मोठी योजना

कन्सल्टंटने व्हायग्रा देण्याची केली होती सूचना

मोनिका यांच्यावर उपचार करणाऱ्या एक नर्सने सांगितले की, त्यांच्याकडे एक सल्लागार आले होते. त्यावेळी त्यांनी मोनिका यांना व्हायग्राचा (Viagra Dose to Covid Patient) डोस देण्याचे सूचवले होते. तसेच व्हायग्रा दिल्यास रूग्ण शुद्धीवर येईल, असे सांगितले. त्यावेळी संबंधित व्यक्ती गंमत करत असल्याचे मला वाटले. मात्र, या प्रकरणात व्हायग्राच्या मोठ्या डोसचा फायदा होऊ शकतो असे त्याने सांगितले. त्यानुसार मोनिका यांना डोस देण्यात आला आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्या कोमातून बाहेर आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com