मानसिक शांतीसाठी गाईला 'जादूची झप्पी'; मोजताहेत 15,000 रुपये

cow hugging
cow hugging
Summary

कोरोना विषाणूच्या थैमानामुळे जगभरात चिंता आणि तणावाचे वातावरण आहे. दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे.

वॉशिंग्टन- कोरोना विषाणूच्या थैमानामुळे जगभरात चिंता आणि तणावाचे वातावरण आहे. दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. दुसरीकडे कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने लोकांना घरामध्ये कैद राहावं लागत आहे. अशात तणाव, चिंता किंवा राग अशा समस्या जाणवू लागणे साधारण आहे. लोक आपापल्या परीने यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताहेत, त्यातच अमेरिका-युरोपमध्ये एक वेगळा ट्रेंड पाहायला मिळतोय. लोक मानसिक शांतीसाठी गाईला आलिंगन देते आहेत. विशेष म्हणजे लोक यासाठी 200 डॉलर मोजत आहेत. (cow hugging trends in america people giving dollar 200 to hug cow)

गाईला आलिंगन देण्याचा ट्रेंड

काँग्रेस नेता मिलिंद देवरा यांनी सीएनबीसीचा एक व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, अमेरिकेतील लोक गाईला आलिंगन देण्यासाठी तासाला 200 डॉलर ( 15,000 रुपये) मोजत आहेत. देवरा यांनी लिहिलंय की, भारत यात खूप पुढे आहे. भारतात गाईची 3 हजार वर्षांपासून पूजा केली जातेय.

cow hugging
फॅबीफ्लूच्या वाटपाप्रकरणी गौतम गंभीर अडचणीत

असा दावा केला जातोय की, गाईला आलिंगन दिल्याने तणाव कमी होतो, शिवाय एखाद्या पाळीव प्राण्यासोबत राहिल्याने मानसिक आरोग्य लाभते. भारतामध्ये गाईला गळ्याला लावण्याची परंपरा जुनी आहे. आता जगभरात हा ट्रेंड वाढत असल्याचं पाहायला मिळतोय. डॉक्टराचं म्हणणं आहे की, गाईला आलिंगन देण्याचा अनुभव एखाद्या लहान मुलाला किंवा पाळीव प्राण्याला पाळण्याप्रमाणे आहे. एक आलिंगन हार्मोन ऑक्सीटोसिन, सेरोटोसिन आणि डोपामाईनला ट्रिगर करते, ज्यामुळे कोर्टिसोल (तणाव हार्मोन) कम करते. यामुळे तणावाची पातळी, चिंता अशाप्रकारची लक्षणं कमी होतात.

गाईचा स्वभाव शांत, कोमल असतो. शिवाय गाईला आलिंगन दिल्याने तिच्या शरीराचे तापमान, हळूवार हृदय धडकणे आणि तिच्या मोठ्या आकाराचा फायदा दोतो. यामुळे शरीराचे मेटाबोलिजम, इम्युनिटी आणि तणाव प्रतिक्रिया रेग्युलेट होण्यास मदत होते. 'लाईव्ह हिंदूस्तान'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com