esakal | मगरीने चक्क ड्रोनवरच घातली झडप, व्हिडिओ होतोय व्हायरल...
sakal

बोलून बातमी शोधा

crocodile.jpg

मगरीने चक्क ड्रोनवरच घातली झडप, व्हिडिओ होतोय व्हायरल...

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

ऑस्ट्रेलियातील डार्विन वन्यजीव उद्यानात एक विलक्षण प्रकार घडला. एका डॉक्युमेंट्रीसाठी मगरींचे चित्रीकरण सुरु असताना मगरीने थेट चित्रीकरण करणाऱ्या ड्रोनवरच झडप घातली. काही वेळाने तिने हा ड्रोन तोंडातून बाहेर काढला खरं; पण मगरीचा रुद्रावतार पाहून चित्रीकरण करणाऱ्या टिमला मात्र धडकी भरली. या घटनेचा व्हिडीयो प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून जगभरात त्याची चर्चा होत आहे.

ही विचित्र घटना घडली ऑस्ट्रेलियातील डार्विन वन्यजीव उद्यानात. त्याचं झालं असं की, या उद्यानात एका न्यूज चॅनेलची टिम डॉक्युमेंट्रींचे चित्रीकरण करण्यासाठी गेली होती. ड्रोनच्या सहाय्याने तिथल्या मगरींचे चित्रीकरण सुरु होते. थोडा वेळ मगरींच्या विविध हालचालींचे चित्रीकरण करण्यात आले. काही वेळानंतर मगरींचे जवळून चित्रीकरण करण्यासाठी टिमने ड्रोन कॅमेरा पाण्याजवळ नेला. दरम्यान काही मगरी खोल पाण्यात गेल्यामुळे दिसेनाशा झाल्या.

हेही वाचा: संपूर्ण देशात 'ब्लॅकआऊट'! इंधन संपलं, पैसाच नाही...

पण एक मगर मात्र अजूनही वर होती. तिच्या चित्रीकरणासाठी टिमने ड्रोन कॅमेरा तिच्या अगदी जवळ नेला . पाणी शांत होतं आणि त्यावर मगरही अगदी शांत होती.पण ड्रोन जास्त जवळ आल्याचं पाहून कुणाला काही कळायच्या आत मगरीने चक्क ड्रोनवरच झडप घातली .ड्रोनला तिने आपल्या जबड्यात धरले. मगरीचा हा रुद्रावतार पाहून चित्रीकरण करणाऱ्या टिमला या धडकीच भरली.त्यांना सुचायचंच बंद झालं. सुदैवाने थोड्याच वेळात मगरीने हा ड्रोन जबड्याबाहेर काढला .टिमने मोठ्या कसरतीने हा ड्रोन मिळवला. त्यावर मगरीच्या तीक्ष्ण दातांचे व्रण स्पष्ट दिसत होते. हा ड्रोन खराब झाला असला तरी त्यातून चित्रीत झालेला डेटा मिळवण्यात यश आलं. याचा व्हिडियो इंटरनेटवर शेअर करताच तो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला.

loading image
go to top