खनिज तेलाचा भडका

पीटीआय
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

इराणच्या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आज खनिज तेलाचा भडका उडाला. आखाती देशांतील तणाव वाढल्याने तेलाचा पुरवठा कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे तेलाच्या भावात आज दोन टक्‍क्‍यांनी वाढ झाली.

हाँगकाँग - इराणच्या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आज खनिज तेलाचा भडका उडाला. आखाती देशांतील तणाव वाढल्याने तेलाचा पुरवठा कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे तेलाच्या भावात आज दोन टक्‍क्‍यांनी वाढ झाली. 

सौदी अरेबियाच्या किनारपट्टीवर इराणच्या तेलवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाला. या हल्ल्यामागे सौदी अरेबिया असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावात २.३ टक्‍क्‍यांनी वाढ होऊन प्रतिबॅरल ६०.४६ डॉलरवर पोचला. काही आठवड्यांपूर्वी सौदी अरेबियातील दोन मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ला झाला होता. यामुळे जागतिक पातळीवर तेलाच्या भावाचा भडका उडाला होता. सौदी अरेबियाने या हल्ल्यासाठी इराणकडे बोट दाखविले होते. 

आता इराणच्या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्याने आखाती देशांतील तणाव आणखी वाढला आहे. यामुळे जागतिक तेल वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इराणच्या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यामागे सौदी अरेबिया असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचा परिणाम खनिज तेलाच्या भावावर झाला. अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार चर्चेतून तोडगा निघण्याच्या शक्‍यतेने खनिज तेलाच्या भावात मागील काही काळापासून वाढ सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crude oil rate increase