esakal | विंडीजच्या 'या' क्रिकेटपटूला पाकचे नागरिकत्व अन् सर्वोच्च पुरस्कारही
sakal

बोलून बातमी शोधा

Darren Sammy

एखाद्या देशाचे मानद नागरिकत्व मिळणारा सॅमी हा तिसरा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी 2007 च्या विश्वकरंडकानंतर मॅथ्यू हेडन आणि हर्शेल गिब्ज यांना सेंट किट्स सरकारने मानद नागरिकत्व दिले होते.

विंडीजच्या 'या' क्रिकेटपटूला पाकचे नागरिकत्व अन् सर्वोच्च पुरस्कारही

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद : वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी याला पाकिस्तानचे मानद नागरिकत्व देण्यात येणार असून, त्याला पाकिस्तानचा सर्वोच्च निशान-ए-पाकिस्तान या पुरस्कारानेही गौरविण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी त्याला पाकिस्तानचे मानद नागरिकत्व देणार आहे. शनिवारी याबाबतची घोषणा करताना पाक सरकारने म्हटले आहे, की सॅमी सध्या पाकिस्तान सुपर लीगच्या पाचव्या मोसमात पेशावर संघाचा सदस्य आहे. त्यामुळे त्याला पाकिस्तानचे नागरिकत्व आणि निशान-ए-पाकिस्तान हा सर्वोच्च नागरि पुरस्कार 23 मार्चला प्रदान करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी हे त्याला सन्मानित करणार आहेत. 

एखाद्या देशाचे मानद नागरिकत्व मिळणारा सॅमी हा तिसरा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी 2007 च्या विश्वकरंडकानंतर मॅथ्यू हेडन आणि हर्शेल गिब्ज यांना सेंट किट्स सरकारने मानद नागरिकत्व दिले होते. पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरु करण्यात सॅमीचे मोठे योगदान आहे. 2017 मध्ये लाहोरला पीएसएलचा अंतिम सामना खेळण्यासाठी तयार असणारा सॅमी एकमेव क्रिकेटपटू होता.