
आधीच कर्जबाजारी असलेल्या पाकिस्तानने आता जागतिक समुदायाकडे कर्जमाफीसाठी विनंती केली आहे. कोरोना संकट निवळेपर्यंत जागतिक समुदायाने अल्प उत्पन्न गटातील आणि कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांकडून कर्जवसूली स्थगित करावी, अशी याचना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे.
इस्लामाबाद - आधीच कर्जबाजारी असलेल्या पाकिस्तानने आता जागतिक समुदायाकडे कर्जमाफीसाठी विनंती केली आहे. कोरोना संकट निवळेपर्यंत जागतिक समुदायाने अल्प उत्पन्न गटातील आणि कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांकडून कर्जवसूली स्थगित करावी, अशी याचना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पाकिस्तानच्या तिजोरीत अनेक वर्षांपासून खडखडाट असून अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. कोरोना परिस्थितीमुळे देशाच्या तुटपुंज्या उत्पन्नालाही पाय फुटले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी इम्रान खान हे विविध वित्तसंस्थांकडे मदतीची याचना करत आहेत. येथील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इम्रान यांनी अविकसीत देशांचे कर्ज माफ करण्याचीही मागणी केली. आमसभेत दहा मुद्दे असलेला अजेंडा सादर करताना इम्रान खान यांनी त्यावर तातडीने कृती करण्याची विनंतीही केली आहे.
इम्रान यांच्या विनंत्या
Edited By - Prashant Patil