esakal | 'डेल्टा व्हेरियंट' लसींचा प्रभाव करतोय कमी; UKच्या तज्ज्ञांचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

Delta Variant

डेल्टा आणि अल्फा व्हेरियंटचा लसीवर काय परिणाम करतात, याबाबत इंग्लंड आणि स्कॉटलंडनेही संशोधन केले आहे. डेल्टा व्हेरियंट अल्फापेक्षा लसीचा प्रभाव अधिक वेगाने कमी करतो, असे या संशोधनात दिसून आले आहे.

'डेल्टा व्हेरियंट' लसींचा प्रभाव करतोय कमी; UKच्या तज्ज्ञांचा दावा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात सापडल्या कोविड-१९ च्या डेल्टा व्हेरियंट हा अल्फा व्हेरियंटपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डेल्टा व्हेरियंट अल्फा व्हेरियंटपेक्षा ६० टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचे युकेच्या आरोग्य तज्ज्ञांनी केलेल्या एका संशोधनात आढळून आले आहे. तसेच काही प्रमाणात हा व्हेरियंट लसीची कार्यक्षमताही कमी करत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Delta variant 60 per cent more transmissible and reduces vaccine effect says UK experts)

पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHE) कोरोना व्हायरसच्या प्रत्येक प्रकाराचा मागोवा घेत आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे संक्रमित झालेल्यांची संख्या २९ हजार ८९२ वरून ४२ हजार ३२३ वर गेली आहे. पीएचईने केलेल्या नव्या संशोधनात म्हटले आहे की, अल्फाच्या तुलनेत डेल्टाचे संक्रमण ६० टक्के जास्त आहे. अल्फाच्या तुलनेत डेल्टा व्हेरियंटच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. युकेमध्ये ९० टक्के नवे रुग्ण हे डेल्टा व्हेरियंटमुळे संक्रमित झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: 'डीपफेक पॉर्नोग्राफी'ची येऊ शकते महासाथ; तज्ज्ञांनी दिला इशारा

डेल्टा आणि अल्फा व्हेरियंटचा लसीवर काय परिणाम करतात, याबाबत इंग्लंड आणि स्कॉटलंडनेही संशोधन केले आहे. डेल्टा व्हेरियंट अल्फापेक्षा लसीचा प्रभाव अधिक वेगाने कमी करतो, असे या संशोधनात दिसून आले आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे युकेमध्ये वाढलेल्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. रुग्णांची संख्या आणखी वाढू नये, यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीचे चीफ एक्झिक्युटिव्ह डॉ. जेनी हॅरिस म्हणाले की, देशात डेल्टा व्हेरियंटच्या केसेस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे बचावासाठी लसीकरण हा चांगला पर्याय आहे. नागरिकांनी स्वत:हून पुढे येत लसीकरण करून घ्यावे. २ डोस कोरोना विरोधात अधिक प्रभावी ठरू शकतात.

(Edited by : Ashish N. Kadam)

जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.