डेल्टा व्हेरियंटमुळे युरोपात लसीकरण वेगात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

डेल्टा व्हेरियंटमुळे युरोपात लसीकरण वेगात

लिस्बन (पोर्तुगाल) - युरोपीय देश कोरोना संसर्ग (Corona Infection) रोखण्यासाठी लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) वेगाने राबवत आहेत. विशेषत: डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची खबरदारी घेत आहेत. सध्या युरोपात सुट्या सुरू असून वातावरण चांगले असल्याने नागरिक घराबाहेर पडण्याचा धोका (Danger) वाढला आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसून काही देशांनी मास्कचे बंधनही काढून टाकले आहे. (Delta Variant Accelerates Vaccination in Europe)

युरोपीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या (इसीडीसी) मते, पूर्ण लसीकरण न झालेल्या नागरिकांना डेल्टा व्हेरियंटचा धोका अधिक आहे. साथरोग नियंत्रण केंद्राकडून सुमारे ३० देशांवर लक्ष ठेवले जाते. त्यामुळे ऑगस्टअखेरपर्यंत युरोपीय देशात ९० टक्के रुग्ण हे डेल्टा संसर्गाने बाधित होतील, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे लसीकरणाचे काम वेगाने होणे गरजेचे आहे, असे इसीडीसीने इशारा दिला आहे. ब्रिटन, पोर्तुगाल, रशियात संसर्गाचे रुग्ण वाढत चालले आहेत. ब्रिटनमध्ये डेल्टाचे रुग्ण एका महिन्यापेक्षा कमी चार पटीने वाढले तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत शुक्रवारी ४६ टक्क्याने वाढले आहेत.