स्वीडनमध्ये ‘धूम’ स्टाइल चोरी

पीटीआय
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

स्टॉकहोम - आपण अनेक बॉलिवूडपटांतून धाडसी चोरीचे कथानक पाहिले असेल. ‘शालीमार’, ‘रूप की रानी, चोरों को राजा’, ‘धूम’ यांसारख्या चित्रपटांतील चोरीची योजना आणि त्यासाठी लढवलेल्या क्‍लृप्त्या पाहून आश्‍चर्यचकित होतो. अशीच फिल्म स्टाइलची चोरीची घटना स्वीडनमध्ये घडली. दोन चोरांनी स्वीडनच्या एका भागात मध्ययुगीन चर्चमध्ये ठेवलेले कोट्यवधींचे ऐतिहासिक मौल्यवान दागिने चोरून स्पीडबोटने पोबारा केल्याचे उघडकीस आले. 

स्टॉकहोमपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्ययुगीन चर्चमध्ये १७ व्या शतकातील ऐतिहासिक दागिन्यांचे, राजा - राणी यांचे मुकुट, आभूषणांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. घटना घडली तेव्हा सभागृहात अनेकजण जमलेले होते. मात्र, काही कळण्याच्या आत दोन चोरट्यांनी सुरक्षा काच तोडली आणि महागड्या दागिन्यांवर हात साफ केला. सुरक्षा दलाला चोरीची भणक लागू नये म्हणून चोरांनी अगोदरच सिक्‍युरिटी अलार्म बंद केला होता. त्या चोरट्यांनी वेगाने हालचाल करत काही समजण्याच्या आतच तेथून पोबारा केला. यासाठी त्यांनी स्पीडबोटीचा वापर केला. चोरांनी किंग कार्ल नववे, राणी ख्रिस्तियाना यांचे रत्नजडित मुकुट लंपास केल्याचे पोलिसांनी सांगितले. राजाचा मुकुट हा सोन्याचा होता आणि त्यात मौल्यवान खडे आणि मोती होते. राणीचा मुकुट मोती आणि खड्यांचा होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhoom Style Theft in Swindon