वापरलेल्या कंडोमपासून तिने केली स्वतःचीच गर्भधारणा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

- लस वेगास हॉटेलमधील एका महिला स्वच्छता कर्मचाऱ्याने वापरलेल्या कंडोमधील शुक्राणूंनी स्वत: गर्भधारणा करून घेतली. हे शुक्राणू एका करोडपती व्यक्तीचे होते. त्यामुळे त्यापासून गर्भधारणा होऊन तिला एक मुलगा झाला. या मुलाला या करोडपती व्यक्तीचे आश्रय मिळवण्यासाठी दाखल केलेला खटला तिने जिंकला आहे. 

जाने नावाची 40 वर्षीय महिला लस वेगास हॉटेलमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते. ती 36 वर्षांची असताना हॉटेलमधील रूम साफ करताना वापरलेले कंडोम तिच्या निदर्शनास आले. ते त्या रूममध्ये आलेल्या एका 24 वर्षीय करोडपती तरुणाचे होते, हे तिला माहीत होते. या कंडोममधील शुक्राणूंचा वापर तिने स्वतःची गर्भधारणा होण्यासाठी केला. त्यानंतर गर्भधारणा होऊन तिने एका मुलाला जन्म दिला. म्हणजेच त्या करोडपती व्यक्तीशी शारीरिक संबंध न ठेवताही तिने त्या मुलाला जन्म दिला आहे. 

यानंतर, या मुलाला त्या करोडपती व्यक्तीचा आश्रय मिळवून देण्यासाठी तिने न्यायालयात खटला दाखल केला; परंतु तिने शुक्राणू चोरून गर्भधारणा केल्याचे न्यायालयाला सत्य सांगितले. तिने न्यायालयासमोर कबूल केले की, तिचा त्या व्यक्तीशी तसा कुठलाही शारीरिक संबंध आला नाही. ती ज्या वेळी हॉटेलमधील रूम साफ करण्यास गेली होती, त्या दरम्यान, तिची आई होण्याची नितांत इच्छा होती. अशा वेळी एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडून बाळ होण्याची शक्‍यता असल्याची संधी तिने लगेच घेतली. 

ती करोडपती व्यक्तीच त्या मुलाचे वडील असल्याचे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने, त्या मुलाला आश्रय म्हणून मदत देण्याचे आदेश त्या व्यक्तीला दिले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Did a Hotel Cleaner Who Stole Sperm from a Used Condom Win Child Support?