esakal | तुम्हाला माहीत आहे का? लंडन ते कोलकता बसने प्रवास करता येत होता !
sakal

बोलून बातमी शोधा

London_Culcutta

लक्‍झरी स्वरूपाच्या या बसमध्ये वाचन, वैयक्तिक झोपेची स्वतंत्र व्यवस्था, पार्टीसाठी रेडिओ, टेप व संगीताचा आनंद प्रवासी घेऊ शकत होते.

तुम्हाला माहीत आहे का? लंडन ते कोलकता बसने प्रवास करता येत होता !

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : इंग्लंडहून (England) भारतात (India) बसने प्रवास करता येत होता. कोणालाही हे खरं वाटणार नाही; मात्र लंडन (London) ते कलकत्ता (आताचे कोलकता) (Kolkata) अशी बससेवा 1950 च्या दशकात चालू झाली होती. लंडनहून भारतात बसने येता येत होते व भारतातून लंडनला जाता येत होते. (Did you know that it was possible to travel by bus from London to Kolkata)

हेही वाचा: "उजनी'चा आदेश रद्द करण्याचे श्रेय शरद पवार व शेतकऱ्यांनाच !

लंडन ते कलकत्ता हा जगातील बस प्रवासाचा सर्वांत लांबचा पल्ला मानला जात होता. लंडन ते कलकत्ता हे सात हजार 962 किलोमीटरचे बस प्रवासाचे अंतर होते. 15 एप्रिल 1957 रोजी व्हिक्‍टोरिया कोच स्टेशन (Victoria Coach Station), लंडन येथून पहिली बस भारतात यायला निघाली होती. 50 दिवसांचा प्रवास करून ती 5 जूनला भारतात पोचली होती. भारतात या बसचा प्रवास दिल्लीतून (Delhi) आग्रा (Agra), अलाहाबाद (Alahabad), बनारस (Banaras), कलकत्ता असा होता. अल्बर्ट ट्रॅव्हल या कंपनीची ही बससेवा होती. इंग्लंड, बेल्जियम (Belgium), पश्‍चिम जर्मनी (West Germany), ऑस्ट्रिया (Austria), युगोस्लाव्हिया (Yugoslavia), बल्गेरिया (Bulgaria), तुर्की (Turkey), इराण (Iran), अफगाणिस्तान (Afghanistan), पश्‍चिम पाकिस्तान (West Pakistan) या देशांतून प्रवास करून बस भारतात येत होती. 1973 पर्यंत ही बससेवा चालू होती. त्यानंतर ही बससेवा बंद झाली. लंडन - कलकत्ता बससेवा या विकिपीडियावर या बससेवेचा उल्लेख करण्यात आला आहे.

हेही वाचा: नवीन नोकरी शोधत आहात? कुठे जॉईन होत आहात? तर या गोष्टी ठेवा लक्षात

तेव्हा एकेरी प्रवासाचे बसभाडे 85 पौंड (आताचे साधारण आठ हजार 762 रुपये) होते. 20 प्रवाशांना घेऊन ही बस भारतात आली होती. त्यापैकी पाच पुरुष व दोन महिला अशा सात प्रवाशांनी याच बसने परतीचा प्रवास केला होता. या बस प्रवासात सर्व प्रकारची सोय करण्यात आली होती. सर्व सोयींनी युक्त किचन त्यामध्ये होते. लक्‍झरी स्वरूपाच्या या बसमध्ये वाचन, वैयक्तिक झोपेची स्वतंत्र व्यवस्था, पार्टीसाठी रेडिओ, टेप व संगीताचा आनंद प्रवासी घेऊ शकत होते. शॉपिंगसाठी दिवस राखीव होते. प्रवासात दिल्ली, तेहरान, काबूल, इस्तंबुल, साल्सबर्ग, व्हिएन्ना येथे शॉपिंग करता येत होते.

loading image