लाहोर : योगायोगांवर असलेला विश्वास आणखी दृढ झाला आहे. त्याचे असे झाले, इस्लामाबादचा मुक्काम संपवून मी लाहोरला निघालो होतो. गृहपाठ चालू होता म्हणून लक्षात आले, की वाटेत राज कटास नावाचे गाव लागते. बरोबर निम्म्या वाटेत आहे हे गाव किंवा परिसर आहे..वाटेत कुठेच त्या जागेचे माहिती फलक लावलेले दिसले नाहीत. गुगल मॅप लावून प्रवास करायचा विचार पक्का केला. मग वाकडी वाट करून इस्लामाबादहून दोन तास प्रवास मोटर वेने केल्यावर वळालो डावीकडे. मग लहान लहान गावांतून आणि जरा खराब रस्त्यावरून प्रवास करीत अखेर राज कटासला पोहोचलो..तिथे उर्दू भाषेत एक फलक होता जो माझ्या ड्रायव्हरला वाचता आला. जरा पुढे गेलो तर प्रचंड सुरक्षा कर्मचारी उभे होते. आमची कार थांबवून जोरदार चौकशी झाली. भारतीय पत्रकार म्हटल्यावर पासपोर्टपासून ते आयसीसीच्या बॅचपर्यंत सगळे तपासले गेले. मग वॉकीटॉकीवर संदेश झाले मग दोन कमांडो प्रकारातील लोक आले आणि घेऊन गेले. कारण आम्ही राजकटास शिवगंगा मंदिर परिसरात चाललो होतो... आणि योगायोग महाशिवरात्रीचा होता..२००४ साली पहिल्यांदा राज कटासला आलो होतो. तेव्हा हा परिसर अगदीच दुर्लक्षित भग्न होता. महाशिवरात्रीला इथे सजावट केली होती कारण भारतातून भाविक आले होते. ज्यांच्या सुरक्षेसाठी सैनिक आणि पोलिस कर्मचारी तैनात केले होते. परिसर खूप स्वच्छ होता. मंदिराची अवस्था सुधारण्यात आली होती आणि बाकीच्या वास्तूपण जतन करण्याच्या दृष्टीने डागडुजी करून पावले उचलली गेलेली दिसली. महाशिवरात्रीचे निमित्त साधून दिल्ली भागातून भाविक राज कटासला आले होते. शिव शंकराचा जयघोष चालू होता आणि मला मंदिरात जाऊन आरती करायची संधीही मिळाली. पुण्यातून आणलेली बर्फी मी प्रसाद म्हणून घेऊन गेलो होतो..काही लोकांना मी पाकिस्तानला कशाला जातोय, असा प्रश्न पडला होता. राज कटास शिवगंगा मंदिर परिसरासारख्या जागी जाऊन महाशिवरात्रीला मंदिरात जाऊन आरती करायचा योग केवळ पाकिस्तानला जाण्याचा विचार केला आणि चांगला गृहपाठ केल्याने जमवता आला..Superstition : मेळघाटात अंधश्रद्धा थांबता थांबेना.अशी आहे पौराणिक कथापौराणिक कथा अशी आहे, की शिव भगवानांची पत्नी सती हिचा मृत्यू होतो. त्याचा भगवान शंकर भगवानांना खूप त्रास होतो, प्रचंड दु:ख होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात आणि ते जिथे पडतात तीच जागा म्हणजे राज कटास शिवगंगा. या जागी भोलेनाथांनी ढाळलेल्या अश्रूचे प्रतीक म्हणजे एक छान पाण्याचा तलाव दिसतो. बऱ्याच शिवभक्तांनी या जागी येऊन आराधना केल्याचे सांगितले जाते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.