esakal | भारतात लवकरात लवकर लॉकडाऊन गरजेचा;डॉ. फाऊचींनी मोदींना सुचवला फॉर्म्युला

बोलून बातमी शोधा

narendra modi

भारतात लवकरात लवकर लॉकडाऊन गरजेचा;डॉ. फाऊचींनी मोदींना सुचवला फॉर्म्युला

sakal_logo
By
नामदेव कुंभार

देशात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आरोग्य सुविधांचा अभाव असल्यामुळे देशातील परिस्थिती अतिशय भयावह होत चालली आहे. गेल्या 10 दिवसांपासून तीन लाखांपेक्षा जास्त आढळणारी रुग्णसंख्या आज चार लाखांपेक्षा जास्त झाली आहे. देशातील ही परिस्थिती पाहात देशात लॉकाउनशिवाय पर्याय नाही. अमेरिका येथील जो बायडन यांच्या प्रशासनातील वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊजी यांनी मोदी सरकार यांना भारतात लवकरत लवकर लॉकडाउन लावण्याचा सल्ला दिला आहे. भारतातील कोरोनास्थिी भयानक आहे. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तमानपत्राला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारला तीन महत्वाचे सल्ले दिले आहेत.

भारतातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही आठवड्याचा लॉकडाउन लावण्याची गरज आहे. लॉकाउन लावल्यानंतर मोदी सरकार आणि प्रशासनानं तीन पातळ्यांवर काम करण्याची गरज आहे. केंद्र सरकारकडून टास्क फोर्ससारखी एखादी टीम तयार करावी लागेल. या टास्कफोर्सनं तीन पातळ्यांवर विचार करण्याची गरज आहे. त्यामध्ये पहिली महत्वाची बाब, सध्याची परिस्थिती कशी हाताळावी लागेल. पुढील 15 दिवसांत होणाऱ्या परिस्थितीबाबतची तयारी करण्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि दुसरी लाट वाढू नये म्हणून काय तयारी करु शकतो. यावर टास्कफोर्सनं काम करायला हवं.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, देशातील सध्याची परिस्थिती हाताळत असतानाच लसीकरणही वाढवावं लागेल. कारण, लसीकरण वाढवल्यानंतर कोरोनाची दुसरी लाटही आटोक्यात येण्याची शक्यता जास्त आहे. तिसरी महत्वाची बाब म्हणजे, सध्याच्या परिस्थितीला युद्धजन्य परिस्थितीच मानली गेली पाहिजे. त्यामुळे फिल्ड हॉस्पिटलची निर्मीती करावी लागेल. यासाठी फाऊच यांनी चीनं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, गेल्या वर्षी जेव्हा चीन अशा परिस्थिती होतं. त्यावेळी त्यांनी रिकाम्या जागी फिल्ड हॉस्पिटलची निर्मिती केली. त्याच पातळीवर भारतानेही लष्कराच्या मदतीनं फिल्ड हॉस्पिटल उभारण्याची गरज आहे.