esakal | डोमिनिका कोर्टाकडून मेहुल चोक्सीला अंतरिम जामीन मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

PNB fraud accused Mehul Choksis Gitanjali Gems 8 other firms cant trade in shares

डोमिनिका कोर्टाकडून मेहुल चोक्सीला अंतरिम जामीन मंजूर

sakal_logo
By
विनायक होगाडे

डोमिनिका कोर्टाने मेहुल चोक्सीचा जामीन मंजूर केला आहे. अँटिगा आणि बार्बुडा येथे जाण्यासाठी वैद्यकीय कारणास्तव म्हणून हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मेहुल चोक्सी हा भारतातील पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी आहे. हा जामीन फक्त वैद्यकीय उपचारांसाठी म्हणूनच देण्यात आला असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास कोर्टाने सांगितलं आहे. तंदुरुस्त होईपर्यंत हा अंतरिम जामीनास मंजूरी असेल, त्यानंतर त्याला डोमिनिकाला परत आणलं जाईल.

loading image