
अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूटचे सैन्य तज्ज्ञ मायकेल रुबिन यांनी ट्रम्प प्रशासनावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून १ अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर करण्यास परवानगी दिल्याबद्दल तीव्र टीका केली आहे. रुबिन यांनी पाकिस्तानला “चीनचा मांडलिक देश” संबोधत, त्यांच्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांवर बोट ठेवले. या कर्जामुळे केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर त्यांच्या आर्थिक संकटात सापडलेल्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) ला अप्रत्यक्षपणे मदत होत असल्याचा दावा त्यांनी केला.