esakal | चर्चेदरम्यान माइक ‘म्यूट’; वक्त्यांना समान न्याय मिळण्यासाठी नवा नियम
sakal

बोलून बातमी शोधा

trump

पहिल्या चर्चेवेळी ट्रम्प यांनी आक्रमक रुप धारण करत बायडेन यांना बोलण्यासाठी वेळच मिळू दिला नव्हता. तसेच, बायडेन यांनी बोलण्यास सुरवात करताच त्यांचा मुद्दाच ते पूर्ण होऊ देत नव्हते, असे निरीक्षण आहे.

चर्चेदरम्यान माइक ‘म्यूट’; वक्त्यांना समान न्याय मिळण्यासाठी नवा नियम

sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन - अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचा अखेरचा टप्पा सुरु झाला असून डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन दुसरी खुली चर्चा गुरुवारी होत आहे. पहिल्या चर्चेच्या अनुभवावरुन अध्यक्षीय चर्चा समितीने चर्चेच्या नियमांमध्ये बदल केला आहे. नव्या नियमानुसार, एक वक्ता बोलत असताना दुसऱ्या वक्त्याचा माइक पहिली दोन मिनीटे ‘म्यूट’ केला जाणार आहे.

टेनेसी येथे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. पहिल्या चर्चेवेळी ट्रम्प यांनी आक्रमक रुप धारण करत बायडेन यांना बोलण्यासाठी वेळच मिळू दिला नव्हता. तसेच, बायडेन यांनी बोलण्यास सुरवात करताच त्यांचा मुद्दाच ते पूर्ण होऊ देत नव्हते, असे निरीक्षण आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा समितीने नवे नियम जारी केले आहेत. नव्या 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नियमानुसार, ट्रम्प आणि बायडेन यांना चर्चेच्या प्रत्येक टप्प्याच्या सुरुवातीला आपले म्हणणे मांडण्यासाठी दोन मिनीटे वेळ मिळणार आहे. ही दोन मिनीटे प्रतिस्पर्ध्याचा माइक ‘म्यूट’ केला जाणार आहे. या नव्या नियमाला दोन्ही पक्षांनी मान्यता  दिली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आधीच्या नियोजनानुसार, दुसरी चर्चा १५ तारखेला व्हर्च्युअल स्वरुपात होणार होती. ट्रम्प हेच कोरोना रोगातून नुकतेच बरे झाल्याने हा पर्याय ठेवण्यात आला होता. 

मात्र, ट्रम्प यांनी यास नकार दिल्याने ही चर्चा एक आठवडा पुढे ढकलण्यात आली. अध्यक्षीय निवडणुकीतील तिसरी आणि अखेरची चर्चा पुढील आठवड्यात होणार आहे. दुसऱ्या चर्चेचा अजेंडा निश्‍चित झाला असून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर यादरम्यान चर्चा होणार आहे. यावेळी ट्रम्प हे बायडेन यांच्यावर चीनबरोबरील संबंधांवरून टीका करण्याची शक्यता आहे.

हॅरीस यांच्या पुतणीकडून माफीची मागणी
डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरीस यांना देवी दुर्गाच्या रुपात दाखवून हिंदूंच्या भावनांचा अवमान केल्याबद्दल हॅरीस यांच्या पुतणीने माफी मागावी, अशी मागणी येथील काही हिंदू संघटनांनी केली आहे. वकील असलेल्या मीना हॅरीस यांनी दुर्गा देवीचे छायाचित्र घेऊन चेहरा मात्र कमला यांचा लावला होता. ट्वीटरवर प्रसिद्ध झालेले हे छायाचित्र त्यांनी नंतर काढून टाकले. मात्र, या छायाचित्रामुळे हिंदू नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने माफी मागावी, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुढील वर्षी अर्थव्यवस्थेला भरारी : ट्रम्प
कोरोनामुळे आलेल्या संकटातून बाहेर पडत पुढील वर्षी अमेरिकेची अर्थव्यवस्था भरारी घेईल, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. पुढील आर्थिक वर्ष हे अमेरिकेसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचे भाकीतही त्यांनी आज एका प्रचारसभेत केले. यंदाच्या निवडणुकीवर कोरोनाचा निश्‍चित प्रभाव पडणार आहे. संसर्गाच्या काळात अमेरिकेत लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि अर्थव्यवस्था डळमळीत झाली. या गोष्टींचा मतांवर परिणाम होण्याची शक्यता असल्यानेच ट्रम्प यांनी उज्ज्वल भविष्याची चित्रे नागरिकांसमोर रंगविण्यास सुरुवात केली असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

loading image