
Trump Claims PM Modi Promised to Curtail Russian Oil Purchases, Signaling a Major Shift in India's Foreign Policy.
Sakal
वॉशिंग्टन : ‘‘भारत रशियाकडून तेलाची खरेदी करणे थांबवणार असल्याचे आश्वासन माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे,’’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ‘‘रशिया-युक्रेन संघर्षामध्ये रशियावर दबाव आणण्यासाठीचे हे मोठे पाऊल आहे,’’ असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.