

Narendra Modi And Donald Trump
sakal
टोकियो : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत कणखर आहेत. भारतासोबत अमेरिका लवकरच व्यापार करार करणार आहे,’’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष माझ्यामुळेच थांबला,’’ या विधानाचा पुनरुच्चारही त्यांनी केला. हे वक्तव्य करण्यापूर्वी काही तास आधी ७ ते १० मे दरम्यान झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सात विमाने पाडली गेल्याचा दावाही अमेरिकेच्या अध्यक्षांनी केला आहे.