Donald Trump : ट्रम्प यांच्याकडून पुन्हा प्रवासबंदीचे शस्त्र? जगातील ४१ देशांवर तीन स्तरांमध्ये निर्बंध येणार
Travel Restrictions : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने ४१ देशांवर प्रवासबंदी लावण्याची तयारी केली आहे. हा निर्णय तीन स्तरांमध्ये लागू केला जाईल आणि लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार ४१ देशांवर प्रवासबंदी लागू करण्याची शक्यता आहे. या आदेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, काही दिवसांमध्ये त्याची घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येते.