US Survey
US Survey esakal

US Survey : 'ट्रम्प अमेरिकेचे सर्वात खराब राष्ट्रपती, बायडेनसुद्धा 14व्या स्थानावर घसरले; काय म्हणतोय सर्व्हे?

अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका काहीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर जगातल्या सगळ्यात शक्तिशाली देशाचा प्रमुख कोण होणार, याचा निर्णय होणार आहे.

नवी दिल्लीः अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका काहीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर जगातल्या सगळ्यात शक्तिशाली देशाचा प्रमुख कोण होणार, याचा निर्णय होणार आहे.

एकीकडे डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरीकडे जो बायडेन आपल्या विरोधकांपुढे आघाडी घेताना दिसत आहेत. ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष आहे तर बायडेन यांचा डेमोक्रॅटिक पक्ष आहे. दोघांमध्ये चुरशीची लढत होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

US Survey
Jayant Patil: पुत्राची उमेदवारी अन् जयंतरावांची कसोटी; टप्प्यात करणार 'कार्यक्रम'? प्रतीकचा 'पार्थ पवार' होऊ नये म्हणून खबरदारी!

दरम्यान, एक सर्व्हेक्षण पुढे आलेलं असून ज्यात डोनाल्ड ट्रम्प हे सर्व ४५ राष्ट्राध्यक्षांपैकी सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष असल्याचं समोर आलेलं आहे. या यादीमध्ये ते सगळ्यात शेवटच्या स्थानावर जावून बसले आहेत. तर जो बायडेन हे १४व्या स्थानावर आहेत.

अमेरिकेमध्ये जे लोक गृहयुद्ध थांबवण्यासाठी किंवा अडचणीच्या प्रसंगातून बाहेर पडण्यात अपयशी ठरले, त्यांच्यापेक्षाही ट्रम्प मागे पडले आहेत. राजकीय अभ्यासक जस्टिन वान आणि ब्रँडन रोटिंगहॉस यांनी हे सर्व्हेक्षण केलं आहे.

US Survey
Ameen Sayani: बहनों और भाइयों... रेडिओच्या जगातील आवाजाचा जादूगार हरपला; अमीन सयानी यांचे निधन

सर्व्हे करणाऱ्या वान आणि ब्रँडन यांचं म्हणणं आहे की, जो बायडेन यांची सगळ्यात मोठी कामगिरी अशी आहे की, त्यांनी ट्रम्प यांच्या तावडीतून अध्यक्षपद वाचवलं. विद्यमान अध्यक्षांनी पुन्हा पारंपारिक शैलीत काम करुन स्वतःला सिद्ध केलं आहे.

कोस्टल कॅरोलिना युनिव्हर्सिटीचे वॉन आणि ह्यूस्टन युनिव्हर्सिचे रोटिंगहॉस यांनी १५४ दिग्गजांचे सर्व्हेक्षण केले आहे. ते लोक अमेरिकन पॉलिटिकल सायन्स असोसिएशनशी संबंधित आहेत. सर्व्हेमध्ये ४५ अध्यक्षांचा समावेश करण्यात आलेला होता. २०१५ आणि २०१८ या वर्षातही असेच सर्व्हेक्षण करण्यात आलेले होते.

पहिली, दुसरी, तिसरी पसंती कुणाला?

आवडत्या राष्ट्राध्यक्षांमध्ये अब्राहम लिंकन पहिल्या स्थानावर आहेत. त्यांनी अमेरिकेतल्या गुलामगिरीवर मोठं काम उभं केलं होतं. गृहयुद्धाच्या काळात त्यांनी सक्षमपणे देशाचं नेतृत्व केलं होतं. दुसऱ्या स्थानावर फ्रँकलिन डेलानो रुझवेल्ट आहेत. यांनी मंदी आणि दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचे नेतृत्व केलेलं. तर तिसऱ्या स्थानावर जॉर्ज वॉशिंग्टन आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com