

US and Japan Sign Rare Earth Minerals Trade Deal
Sakal
टोकियो : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जपान दौऱ्यात अमेरिका आणि जपानमध्ये दुर्मीळ खनिजांच्या व्यापाराबाबत करार झाला. जपानच्या नव्या पंतप्रधान सानाए तकाईची यांनी केलेले स्वागत आणि नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्याचे दिलेले आश्वासन यामुळे समाधानी झालेल्या ट्रम्प यांनीही, जपानला सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दोन्ही देशांनी एकमेकांच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले.