ट्रम्प यांचा TikTok ला अल्टिमेटम; मालकी विका अन् मोकळे व्हा...

सुशांत जाधव
Tuesday, 4 August 2020

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. चिनी कंपनी पूर्णत: आपली मालकी हक्क मायक्रोसॉफ्टला देणार असेल तरच अमेरिकेत TikTok ची चलती राहिल. अन्यथा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनीच्या TikTok अ‍ॅपच्या मालकांना इशारा दिलाय.  15 सप्टेंबरपर्यंत TikTok अ‍ॅप अमेरिकन कंपनीच्या मालकीचे झाले नाही तर त्यावर बंदी घालू, अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे. अमेरिकेतील स्थानिक प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी चिनी अ‍ॅपसंदर्भात आपली ठाम भूमिका मांडली. अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft) Tik Tok अ‍ॅप खरेदी करण्याच्या तयारीत आहे. ट्रम्प यांनी अ‍ॅपवर बंदी घालणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मायक्रोसॉफ्ट आणि चिनी कंपनी बाइडन्स यांच्यातील TikTok खरेदी-विक्रीची बोलणीत खंड पडल्याचे वृत्त यापूर्वी समोर आले होते. 

मुक्त व्यापार करार उभयपक्षी लाभाचा

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. चिनी कंपनी पूर्णत: आपली मालकी हक्क मायक्रोसॉफ्टला देणार असेल तरच अमेरिकेत TikTok ची चलती राहिल. अन्यथा TikTok ला अमेरिकेत थारा मिळणार नाही, असे संकेतच ट्रम्प यांनी दिले आहेत.  यासंदर्भात ट्रम्प आणि मायक्रोसॉफ्टचे प्रमुख  सत्या नडेला यांच्यात देखील चर्चा झाली आहे.  यापूर्वी ट्रम्प यांनी सुरक्षितेच्या कारणास्तव TikTok वर बंदी घालण्याचा इशारा दिला होता. TikTok संदर्भात आम्ही अन्य पर्यायाचा विचारही करत आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मायक्रोसॉफ्ट किंवा अन्य कोणत्याही कंपनीने TikTok खरेदी केले तर अमेरिकेत यावर बंदी घालण्यात येणार नाही. चिनी अ‍ॅपसंदर्भात संपूर्ण मालकी हक्क विकत घेण्याचा प्रयत्न करावा, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे हिस्सेदारीने TikTok ची डोकेदुखी थांबणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यासाठी ट्रम्प यांनी चिनी कंपनीला 15 सप्टेंबर्यंत अल्टिमेटम दिले आहे. भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीनंतर TikTok अडचणीत आले आहे. भारतात चिनी कंपनीच्या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. हे अ‍ॅप जर अमेरिकन कंपनीच्या अथवा अन्य कोणत्या कंपनीने खरेदी केले तर भारतातील अ‍ॅपवरील निर्बंध हटणार का? हे पाहणे ही महत्वपूर्ण ठरेल. दुसऱ्या कंपनीच्या मालकीचे अ‍ॅप TikTok नावासह राहणार की नावात काही बदल होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump says tiktok out of business in us if not sold by september 15