Donald Trump: पुन्हा ‘ट्रम्प’ कार्ड..! विजय निश्‍चित; कमला हॅरिस यांचा स्वप्नभंग

US 2024 Election: अमेरिकेतील ४७ व्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय निश्चित झाला आहे. ७८ वर्षांच्या ट्रम्प हे अमेरिकेचे सर्वाधिक वयाचे अध्यक्ष ठरले आहेत.
Donald Trump
Donald Trump celebrating victory after securing the U.S. Presidential electionsakal
Updated on

वॉशिंग्टन: अमेरिकेत ४७ व्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रसिद्ध उद्योगपती आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय निश्‍चित झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे अध्यक्षपदाचे स्वप्न भंगले आहे. निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली नसली तरी विजयासाठी आवश्‍यक असलेला २७० इलेक्टोरल मतांचा टप्पा ट्रम्प यांनी ओलांडला आहे. यामुळे ७८ वर्षांचे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्ष म्हणून निवडून येणारे सर्वाधिक वयाचे व्यक्ती ठरले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com