डोनाल्ड ट्रम्प म्हणतात... अनेक प्रांतांचे गर्व्हनर दुबळे

अटलांटा - जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूप्रकरणी आंदोलनास हिंसक वळण लागत असून संवेदनशील भागात ‘स्वात’ची टिम तैनात करण्यात आली.
अटलांटा - जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूप्रकरणी आंदोलनास हिंसक वळण लागत असून संवेदनशील भागात ‘स्वात’ची टिम तैनात करण्यात आली.

वॉशिंग्टन - कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड पोलिसांच्या पाशवी बळाचा बळी ठरल्यामुळे देशभर आंदोलनाचा भडका उडाला असला तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक वक्तव्याची तोफ डागणे कायम ठेवले. अनेक प्रांतांचे गव्हर्नर दुबळे आहेत. आंदोलकांना काबूत आणणे शक्य होत नसल्यामुळे ते मूर्ख असल्याचे चित्र निर्माण करीत आहेत, अशी खळबळजनक विधाने त्यांनी केली. लुटालूट, हिंसाचार माजविलेल्या आंदोलकांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आंदोलनाचा वणवा व्हाइट हाउस परिसरात येऊन धडकल्यामुळे गुप्तचर अधिकाऱ्यांना ट्रम्पना खंदकात नेणे भाग पडले होते. या पार्श्वभूमीवर ट्रम्प रोझ गार्डनमध्ये देशाला संबोधून भाष्य करण्यापूर्वी पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. ट्रम्प यांनी लष्कराला पाचारण करण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्याआधी ट्रम्प यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली तेव्हा गव्हर्नरांसह कायदा अंमलबजावणी व राष्ट्रीय सुरक्षा अधिकारीही उपस्थित होते. प्रांतांच्या नेत्यांना उद्देशून ट्रम्प म्हणाले की, तुमच्या पैकी बहुतेक जण दुबळे आहेत. तुम्हाला बरेच कडक व्हावे लागेल. तुम्ही आंदोलकांना अटक करायला हवी. मिनियापोलिसमध्ये शांतता प्रस्थापित केलेल्या नॅशनल गार्डसना तुम्ही पण तैनात करावे.

हिंसाचार करणाऱ्या लोकांचा तुम्ही छडा लावा, त्यांना दहा वर्षे तुरुंगात टाका, मग तुम्हाला असे प्रकार पुन्हा कदापि घडताना दिसणार नाहीत. वॉशिंग्टनमध्ये आम्ही हेच करतो आहोत. पूर्वी लोकांनी कधीही पाहिले नाही असे काहीतरी आम्ही करणार आहोत.
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com