
वॉशिंग्टन : पनामा कालवा आणि ग्रीनलँड यांना पुन्हा एकदा अमेरिका सरकारच्या अखत्यारित आणण्यासाठी सैन्यबळाचा वापर करण्याचा पर्याय खुला असल्याचा इशारा अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला, अमेरिकेच्या आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्या हे दोन्ही भाग अमेरिकेकडे असणे आवश्यक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या विधानाला पनामा आणि ग्रीनलँडने विरोध केला आहे.