Trump Oath : डोनाल्ड ट्रम्प हे आज अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी देश-विदेशातील बड्या नेत्यांना आणि उद्योगपतींना निमंत्रण देण्यात आले आहे.
वॉशिंग्टन : रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प हे उद्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. ट्रम्प यांच्या शपथविधीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, या शपथविधीसाठी देशविदेशातील बड्या नेत्यांना आणि उद्योगपतींना निमंत्रण देण्यात आले आहे.