esakal | अखेर ट्रम्प यांच्या तोंडाला मास्क; रुग्णालयात जाण्यापूर्वी घेतली खबरदारी
sakal

बोलून बातमी शोधा

Donald Trump

मास्क घालण्यास नकार देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अखेर त्यांच्या तोंडावर मास्क लावला. अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग टोकाला पोहोचल्यानंतर देखील ट्रम्प यांनी मास्क घालणे टाळले होते.

अखेर ट्रम्प यांच्या तोंडाला मास्क; रुग्णालयात जाण्यापूर्वी घेतली खबरदारी

sakal_logo
By
पीटीआय

न्यूयॉर्क - आंतरराष्ट्रीय समुदायाकडून वारंवार टीका झाल्यानंतर देखील मास्क घालण्यास नकार देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अखेर त्यांच्या तोंडावर मास्क लावला. अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग टोकाला पोहोचल्यानंतर देखील ट्रम्प यांनी मास्क घालणे टाळले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आज  वॉशिंग्टनच्या बाहेर असलेल्या वॉल्टर रीड या लष्करी रुग्णालयाला डोनाल्ड ट्रम्प यांनी  भेट दिली, त्यावेळी त्यांनी मास्क घातल्याचे दिसून आले. ट्रम्प यांनी आज काही जखमी सैनिक आणि डॉक्टरांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांना सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करत मास्क घालावा लागला. माझा मास्क घालण्यास विरोध नाही त्यासाठी केवळ स्थळ आणि काळाचे बंधन असल्याचे मला वाटते, असे ट्रम्प यांनी नमूद केले. याआधी देखील ट्रम्प यांच्या मास्कविरोधी भूमिकेमुळे अध्यक्षपदाचे दावेदार ज्यो बिडेन यांनी त्यांच्यावर टीका केली होती. ‘रुग्णालयात जाताना आपल्याला खबरदारी घेणे गरजेचे असते कारण येथे लोकांना भेटावे लागते, त्यांच्याशी चर्चा करावी लागते,’ असे ट्रम्प यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने ट्रम्प यांचा मास्कबाबतचा सूर बदलला आहे. मागील २४ तासांत अमेरिकेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल साठ हजारांची वाढ झाली आहे. देशाचा अध्यक्ष या नात्याने मला अनेक नेत्यांना भेटावे लागते. यामध्ये  देशोदेशीचे पंतप्रधान, अध्यक्ष, हुकूमशहा यांचा समावेश असतो. त्यावेळी मी मास्क घालणे चांगले दिसणार नाही, असे विधान ट्रम्प यांनी मागे एकदा केले होते. आता देशातील संसर्ग वाढल्याने ट्रम्प यांच्यावर भूमिका बदलण्याची वेळ आली आहे.

Edited by : Kalyan Bhalerao