
वॉशिंग्टन (पीटीआय) : जागतिक बाजारपेठेत अमेरिकेचे चलन असलेल्या ‘डॉलर’ला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास शंभर टक्के करांचा सामना करावा लागेल, असा इशारा अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ब्रिक्स’ गटाला दिला आहे. तसेच, असे प्रयत्न होणार नाही अशी हमी देण्याचे आवाहनही ट्रम्प यांनी केले आहे.