Donald Trump : करार करा किंवा हल्ल्यांना सामोरे जा; ट्रम्प यांचा इराणला इशारा
Global Politics : इराणने नव्या अणुकरारासाठी तयार न झाल्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हवाई हल्ल्यांचा इशारा दिला आहे. कतारमध्ये बोलताना ट्रम्प यांनी इराणवर कडक शब्दांत टीका केली.
दोहा (कतार) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या अणुकरारासाठी इराणवर आज पुन्हा दबाव आणला आहे. इराणने एकतर करार करावा किंवा हवाई हल्ल्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.