TRUTH Social - ट्रम्प यांचा स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

donald trump
donald trumpesakal

नवी दिल्ली : राजधानी वॉशिंग्टनमध्ये 6 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांच्यावर सर्व सोशल मीडिया (social media) कंपन्यांनी बंदी घातली होती. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया साइट्सने निलंबित केले होते. पण आता ट्रम्प स्वत: चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे.

ट्रम्प यांचा नवीन सोशल मीडिय प्लॅटफॉर्म '

ट्रम्पचे वरिष्ठ सल्लागार जेसन मिलरने फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, डोनाल्ड ट्रम्प येत्या 3 ते 4 महिन्यांत सोशल मीडियावर दिसू लागतील असे सांगितले. मिलर म्हणाले की, मला असे वाटते की आपण येणाऱ्या काही महिन्यात ट्रम्प यांना पुन्हा सोशल मीडियावर पाहू शकू. ही गोष्ट त्यांच्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरून होणार आहे. ट्रम्प यांचा नवीन प्लॅटफॉर्म 'सोशल मीडियाचा गेम' पूर्णपणे बदलून टाकेल असा दावा त्यांनी केला आहे.

donald trump
'मलाच मुख्यमंत्री करा, ठाकरेंची शरद पवारांना विनंती'

हिंसा भडकवण्याचा आरोप

ट्रम्प यांच्यावर हिंसा भडकवण्याचा आरोप होता. या घटनेत एका पोलिस अधिकाऱ्यासह पाच जण ठार झाले होते. यानंतर ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमचे निलंबित केले. याशिवाय फेसबुकनेही त्यांचे अकाउंट काढून टाकले. जानेवारीमध्ये ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट 12 तास ब्लॉक केले होते आणि व्हिडिओसह त्यांचे तीन ट्विट हटवले होते.

donald trump
देशमुख आणि परमबीर सिंग यांचे हनीमून कुठे - अमृता फडणवीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com