
अखेरच्या क्षणापर्यंत आपला हेका न सोडणारे अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या प्रशासनाला शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेला सुरक्षित आणि समृद्ध ठेवण्यासाठी नव्या सरकारने काम करावे, असे त्यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात सांगितले आहे.
वॉशिंग्टन : अखेरच्या क्षणापर्यंत आपला हेका न सोडणारे अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या प्रशासनाला शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेला सुरक्षित आणि समृद्ध ठेवण्यासाठी नव्या सरकारने काम करावे, असे त्यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात सांगितले आहे.
ट्रम्प यांनी जाता जाता दिले धक्के; गडबडीत उरकली कामे
ट्रम्प यांनी एका व्हिडिओद्वारे अमेरिकी जनतेशी संवाद साधला. त्यांचा हा व्हिडिओ ‘व्हाइट हाऊस’ने प्रसिद्ध केला. ‘भविष्याकडे वाटचाल करताना अमेरिकी नागरिकांनी द्वेषभावना दूर करून एक येणे आवश्यक आहे. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मी अनेक आव्हानात्मक लढायांना सामोरे गेलो. याच कारणासाठी तुम्ही मला निवडून दिले होते. तुमच्या गरजा पूर्ण करण्यालाच मी प्राधान्य दिले होते. माझी अध्यक्षपदाची कारकिर्द संपत असताना मी तुमच्यासमोर अभिमानाने उभा आहे. अध्यक्ष म्हणून अमेरिकेची सेवा करणे हा सर्वोच्च सन्मान होता. नव्या प्रशासनाला शुभेच्छा देतो,’ असे ट्रम्प म्हणाले. आपल्या या भाषणात ट्रम्प यांनी बायडेन यांचा अजिबात उल्लेख केला नाही. ६ जानेवारीला कॅपिटॉलवर झालेल्या हिंसाचाराबाबत मात्र ते बोलले. कॅपिटॉलवरील हल्ल्याचा निषेध करताना त्यांनी हा अमेरिकेसाठी काळा दिवस होता, असे ते म्हणाले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आपल्या कारकिर्दीत मिळविलेल्या यशाचा पाढाच ट्रम्प यांनी वाचला. कर कमी करणे, चीनवर वचक निर्माण करणे, ऊर्जेत स्वावलंबित्व मिळविणे, अत्यंत कमी कालावधीत कोरोनाप्रतिबंधक लस तयार करणे यांचा दाखला त्यांनी दिला. आम्ही अमेरिकेला तिची ताकद पुन्हा मिळवून दिली, असा दावाही त्यांनी केला. कोणत्याही देशाविरोधात नव्याने युद्ध सुरु न केलेला मी अनेक दशकांमधील पहिलाच अध्यक्ष असेल, असेही ते म्हणाले. ज्यो बायडेन यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच जाहीर केले होते. शपथविधीपूर्वीच ते फ्लोरीडातील आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाले.
बायडेन यांचा शपथविधी सोहळा सुरू LIVE: नवे राष्ट्राध्यक्ष घेणार 35 शब्दांची शपथ
Edited By - Prashant Patil