संयुक्त राष्ट्रेच्या आमसभेसाठी न्यूयॉर्कला येऊ नका; अमेरिकेचे आवाहन

अमेरिकी समितीतर्फे १९२ देशांना एक निवेदनच पाठविण्यात आले आहे. ही बैठक आणि इतर कार्यक्रम व्हर्च्युअल माध्यमातून पार पडावेत.
United Nations
United NationsSakal

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रेच्या (यूएन) (United Nations) पुढील महिन्यात होणाऱ्या आमसभेसाठी (General Assembly) आपले प्रतिनिधी प्रत्यक्ष पाठविण्याचे नियोजन करणाऱ्या दीडशेहून जास्त देशांनी व्हिडिओद्वारे (Video) संदेशाच्या पर्यायाचा विचार करावा असे आवाहन अमेरिकेने (America) केले आहे. ही बैठक सुपर-स्प्रेडर ठरू नये म्हणून न्यूयॉर्कला (Newyork) येऊ नका असे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकी समितीतर्फे १९२ देशांना एक निवेदनच पाठविण्यात आले आहे. ही बैठक आणि इतर कार्यक्रम व्हर्च्युअल माध्यमातून पार पडावेत. त्यासाठी प्रवास करणाऱ्यांमुळे आमची जनता, न्यूयॉर्कवासी तसेच इतर प्रवाशांना अकारण संसर्गाचा धोका वाढेल, असे त्यात नमूद करण्यात आले आहेत.

United Nations
102 व्या स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत तालिबानींचा गोळीबार; अनेकांचा मृत्यू

आमसभेचे आयोजन २१ ते २७ सप्टेंबर असे आठवडाभर चालेल. त्यात हवामान बदल, लस, अन्नपद्धती, ऊर्जा यांसह वर्णभेदविरोधी यूएन जागतिक परिषदेचा विसावा वर्धापनदिन अशा विषयांवर उच्चस्तरीय बैठका होतील. त्यासाठी सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस आणि अध्यक्ष अब्दुल्ला शाहीद यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. जुलैच्या अखेरीस जागतिक नेत्यांना प्रत्यक्ष सहभागाची परवानगी देण्याचा निर्णय यूएनने घेतला. बायडेन प्रशासन मात्र यामुळे चितेंत पडले आहे. केवळ सर्वसाधारण चर्चा हाच एकमेव कार्यक्रम प्रतिनिधींच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडावा असे अमेरिकेचे ठाम मत आहे.

प्रतिनिधी प्रत्यक्ष येणारच असतील तर शिष्टमंडळात कमीत कमी सदस्यांचा समावेश करावा. याचे कारण बहुतांश देशांत सामुहिक संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे अमेरिकेने या निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेच्या साथरोग प्रतिबंध संस्थेने सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींच्या बाबतीत काँटॅक्ट ट्रेसिंगची गरज लागेल असे आताच बजावले आहे.

United Nations
तालिबानी चांगले, त्यांना उगाच बदनाम केलंय - पाकिस्तान

अपेक्षित नेत्यांमध्ये मोदी

असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने याविषयी माहिती मिळविली आहे. त्यानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या निवेदनातील मुख्य मुद्दे असे

  • १२७ देश-सरकारचे प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित राहण्याच्या तयारीत

  • प्रमुख नेते - अध्यक्ष - ज्यो बायडेन (अमेरिका), इमॅन्युएल मॅक्रॉन (फ्रान्स), रिजीब तय्यीप एर्दोगान (तुर्कस्तान), निकोलस मादुरो (व्हेनेझुएला); पंतप्रधान - बोरीस जॉन्सन (ब्रिटन), नफ्ताली बेनेट (इस्राईल), नरेंद्र मोदी (भारत); इतर प्रमुख नेते ः सर्जी लॅव्हरोव (रशियाचे परराष्ट्र मंत्री), हान झेंग (चीनचे उपपंतप्रधान)

  • १३ ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या यादीत अफगाणिस्तानच्या अश्रफ घनी यांचाही समावेश, ज्यांनी १५ ऑगस्ट रोजी तालिबानच्या आक्रमणानंतर पलायन केले

डेल्टा प्रकाराचा सामना करण्यासह संघटनेने विविध प्रतिबंधात्मक उपायांचा नियोजन केले आहे. मुख्यालयात मास्क लावण्याची सक्ती, लसीकरण आणि कोविड चाचणीचा अहवाल असे निकष यात समाविष्ट आहेत. यजमान देश अमेरिका आणि सदस्य देशांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. यूएन समुदायातील प्रत्येक जण सुरक्षित राहावा यावर सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी लक्ष केंद्रित केले असेल.

- स्टीफन दुजारीच, यूएन प्रवक्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com