बायडन यांच्या रडारवर चीन; गुप्तचर यंत्रणांना 90 दिवसांचा अल्टीमेटम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बायडन यांच्या रडारवर चीन; गुप्तचर यंत्रणांना 90 दिवसांचा अल्टीमेटम

बायडन यांच्या रडारवर चीन; गुप्तचर यंत्रणांना 90 दिवसांचा अल्टीमेटम

वॉशिंग्टन : जगात सध्या कोरोनाच्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. डोळ्यांनाही न दिसणाऱ्या या विषाणूने संपूर्ण मानवजातीला वेठीस धरलं आहे. या विषाणूचा उगम चीनमध्ये झाला असून त्यासंदर्भातील सविस्तर माहिती मात्र अद्याप वादग्रस्त आहे. यासंदर्भात सध्या प्रयत्न सुरु आहेत.कोरोना विषाणूचा उगम शोधण्यासाठीचे प्रयत्न दुपटीने वाढविण्याचे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गुप्तचर विभागाला दिले आहेत. याबाबतचा अहवालत ९० दिवसांमध्ये सादर करावा, असे बायडेन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. कोरोनाचा उगम चीनच्या प्रयोगशाळेतूनच झाला असल्याचा दावा केला जात आहे. चीनमधील वुहानमध्ये सर्वप्रथम आढळलेल्या या विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत १६ कोटी ८० लाखांहून अधिक जण बाधित झाले असून किमान ३५ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. (Double efforts to find the origin of the corona; Biden's order to the intelligence department)

हेही वाचा: १ मे पासून लसीकरण सुरू होणार नाही- राजेश टोपे

वुहानमधील प्रयोगशाळेतील अनेक संशोधक नोव्हेंबर २०१९ मध्ये आजारी पडले होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते, असे एका तपासात आढळून आल्यानंतर बायडेन यांनी हे आदेश दिले आहेत. याबाबत तपास करताना प्रयत्नांमध्ये दुपटीने वाढ करण्यास मी गुप्तचर विभागाला सांगितले असून ते निश्‍चित निष्कर्षापर्यंत पोहोचतील, असे बायडेन यांनी सांगितले. या तपासामध्ये चीनने संपूर्ण सहकार्य करावे आणि पारदर्शीपणे सर्व माहिती पुरवावी, यासाठी जगभरातील समविचारी देशांच्या मदतीने त्यांच्यावर दबाव आणणार असल्याचेही बायडेन यांनी सांगितले.

हेही वाचा: कर्मचाऱ्यांची काळजी वाटते; नव्या नियमांवर ट्विटरने सोडलं मौन

चीनकडून टीका
विषाणूच्या उगमाचा नव्याने शोध घेण्याचा अमेरिकेचा प्रयत्न म्हणजे राजकीय खेळी असून ते आपली जबाबदारी झटकत आहेत, अशी टीका चीनने केली आहे. अमेरिकेला वास्तवाशी आणि सत्याशी काहीही देणेघेणे नसून विषाणूच्या उगमाचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेण्यातही त्यांना रस नाही, त्यांना केवळ कुरघोडीचे राजकारण करायचे आहे, असा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. चीनमध्ये तपासणी झाली आहे, आता अमेरिकेनेही त्यांच्या प्रयोगशाळांमध्ये, विशेषत: लष्कराच्या फोर्ट डेट्रीक येथील प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन चीनने केले आहे.

Web Title: Double Efforts To Find The Origin Of The Corona Bidens Order To The Intelligence

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top