ट्रम्प यांच्याकडून अधिकाऱ्याला डच्चू

पीटीआय
Sunday, 5 April 2020

महाभियोगाचा खटला चालविण्यासाठी जी तक्रार कारणीभूत ठरली त्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गुप्तचर संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्याची घोषणा अमेरिकीचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केली. या संदर्भात ट्रम्प यांनी सिनेटच्या गुप्तचर समितीला शुक्रवारी पत्र लिहित, मायकल अटकिन्सन यांच्यावरील आपला विश्वास उडाला आहे. त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.

वॉशिंग्टन - महाभियोगाचा खटला चालविण्यासाठी जी तक्रार कारणीभूत ठरली त्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गुप्तचर संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्याची घोषणा अमेरिकीचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केली. या संदर्भात ट्रम्प यांनी सिनेटच्या गुप्तचर समितीला शुक्रवारी पत्र लिहित, मायकल अटकिन्सन यांच्यावरील आपला विश्वास उडाला आहे. त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रम्प यांच्या विरोधातील प्रकरण समोर आणणाऱ्या अज्ञात व्यक्तीने केलेल्या तक्रारीचा अभ्यास करून ऑगस्टमध्ये अटकिन्सन यांनी ती पुढे पाठविली होती. या तक्रारीच्या आधारेच ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग दाखल करण्यात आला होता. सिनेटमध्ये जानेवारीत ट्रम्प यांच्याविरोधातील ऐतिहासिक महाभियोगाच्या खटल्याची सुनावणी झाली होती. २०२०मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील आपले संभाव्य प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची मागणी ट्रम्प यांनी युक्रेनच्या नेत्यांकडे केली होती. त्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनला अमेरिकेकडून दिली जाणारी अधिकृत मदतही रोखून धरली होती, असा आरोप ट्रम्प यांच्याविरोधात होता. या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर अटकिन्सन यांनी ही तक्रार अमेरिकी कॉंग्रेसकडे पाठविली होती. त्या अधारे ट्रम्प यांची महाभियोगाच्या खटल्यावेळी चौकशी झाली होती. अखेरीस सिनेटमध्ये ट्रम्प यांच्याबाजूने मते पडल्याने त्यांची खुर्ची बचावली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dracks the officer over Trump