Video : राजकीय महिला कैदी कशी पळाली पाहा...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

एक राजकीय महिला कैदी रुग्णालयामधून पळून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे हे घडले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बोगोटा (कोलंबिया): एक राजकीय महिला कैदी रुग्णालयामधून पळून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे हे घडले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऐदा मरलानो (वय 43) असे पळून गेलेल्या महिला कैद्याचे नाव आहे. 2018 मध्ये कोलंबियामध्ये निवडणूका सुरू होत्या, तेव्हा ऐदा मरलानो हिने मत विका ही योजना सुरू केली होती. यामाध्यमातून तीन जागाही निवडून आल्या. या प्रकरणी गेल्या महिन्यात ऐदा मरलानो हिला 15 वर्षांची शिक्षा झाली होती.

ऐदा मरलानो हिने शिक्षा भोगत असताना दात दुखत असल्याची तक्रार केली होती. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टर उपचार करत असताना डॉक्टर व पोलिसांचे लक्ष नसल्याचे पाहून तिने कपड्यांची दोरी तयारी केली व खिडकीतून पळ काढला. यावेळी तिला घेण्यासाठी एक व्यक्ती दुचाकी घेऊन खाली थांबला होता. रुग्णालयाच्या खिडकीतून खाली उतरल्यानंतर दोघांनी दुचाकीवरून पळ काढला. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dramatic escape by jailed Colombian politician caught on video