
न्यूजर्सी मधील प्रिन्स्टन विश्वविद्यालयाच्या परिसरातून गीता व शेखर पाठक यांनी काल मला गेले महिनाभर चिंतेत टाकणाऱ्या ड्रोन्सचे व्हिडियो पाठविले. गीता माझी बहीण व शेखर तिचे पती. गेली तीस वर्षापेक्षा अधिक काळ त्यांचे तेथे वास्तव्य आहे. तथापि, रात्री उडणारे ड्रोन्स त्यांनी आजवर पाहिले नाही, की लाखो अमेरिकन नागरिकांनी विस्मयकारक तसेच भय निर्माण करणाऱ्या या घटनेकडे इतक्या तीव्रपणे लक्ष वेधले नव्हते.