कॅलिफोर्नियाला धोका जंगलातील वणव्यांचा

वृत्तसंस्था
Monday, 24 August 2020

या आगीत अनेक रेडवूड वृक्ष जळून खाक झाले. धुरांचे लोट सर्वत्र उठल्याने हवेचेही मोठे प्रदूषण झाले आहे. घटनेची तीव्रता पाहून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियाला मदत जाहीर कली आहे.

सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्याच्या उत्तर भागात वातावरणात तीव्र बदल झाल्याने जोरदार वारे सुटणे, तापमानात वाढ होणे, विजा कोसळणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे आधीच जंगलातील वणव्यांनी वनसंपत्तीचे प्रचंड नुकसान केले असताना आणखी वणवे पेटण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या आठवड्यात लागलेल्या तीन मोठ्या आगींमुळे येथे सातशेहून अधिक घरांचे नुकसान झाले असून हजारो नागरिकांना घर सोडावे लागले आहे. उत्तर कॅलिफोर्नियात १५ ऑगस्टपासून  जवळपास १२ हजार कोसळल्या असून त्यामुळे जंगलामध्ये ५०० हून अधिक ठिकाणी वणवे पेटले. यातील जवळपास चाळीस ठिकाणची आग अधिक प्रचंड होती. सॅन फ्रान्सिस्को किनारपट्टीवरील जंगलाला लागून असलेल्या गावांचे आगीत मोठे नुकसान झाले. याच भागात दोन मोठे वणवे पेटले असून कोरडी हवा, वारे यामुळे आग पसरत आहे. एकाच आठवड्यात वणव्यांनी दहा लाख एकर जागा भस्मसात केली. या आगीत अनेक रेडवूड वृक्ष जळून खाक झाले. धुरांचे लोट सर्वत्र उठल्याने हवेचेही मोठे प्रदूषण झाले आहे. घटनेची तीव्रता पाहून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियाला मदत जाहीर कली आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to severe climate change in the northern part of California in the US